Advertisement

छ. शिवाजी महाराज ज्ञान स्पर्धेत रुद्र रवि जोशी याचे सुयश.*

*छ. शिवाजी महाराज ज्ञान स्पर्धेत रुद्र रवि जोशी याचे सुयश.*                          विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित शिवछत्रपती यांच्या जीवन चरित्रावर आधारित भव्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण नववर्ष गुढीपाडव्याच्या पावन-पर्वावर आज दि.१९ मार्च रोजी स्थानिक हिंदू सूर्य महाराणा प्रताप उद्यान, श्रीराम मंडप येथे संपन्न झाले. यात पाचवी ते नौवी या कक्षेतील जवळपास 2200 विद्यार्थ्यांचा सहभाग झाला होता. याच्यात वर्ग आठवी मधून छ. शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर उत्कृष्ट लिखाण करून रुद्र रवि जोशी याने दुसरा क्रमांक पटकाविला. यानिमित्त आयोजकांतर्फे त्याला प्रमाणपत्र व प्रोत्साहन पर बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

आपल्या उत्कृष्ट लिखाणाद्वारे त्याने आपली लिखाण व वाचना बद्दलची जागरूकता  दर्शविली,व आज विद्यार्थ्यांनी मोबाईलला बाजूला ठेवून वाचन व लिखाण करणे, आपला इतिहास व आपली संस्कृती बद्दल ज्ञान अर्जित करणे अत्यंत गरजेचे आहे,जरी इंग्रजी माध्यमातून तो शिक्षण घेत असला तरी आपल्या सनातन संस्कृती व इतिहासाबद्दल असलेल्या त्याच्या ज्ञानाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments