Advertisement

*१मे महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम जि. प.प्रा.शाळा उंबरे दहिगाव येथे उत्साहात साजरा*


 *१मे महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम जि. प.प्रा.शाळा उंबरे दहिगाव येथे उत्साहात साजरा*

६३व्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानिमित्त शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. संगीता नारनवर यांच्या शुभहस्ते व निवृत्त सुभेदार बाबासाहेब ठोंबरे, बाळासाहेब मकर,माणिक ठोंबरे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी विद्यार्थी हिताला प्राधान्य देऊन वरील सर्व मंडळींनी तसेच परिवर्तन ग्रुप व नवी मुंबई म न पा कार्यरत सोमनाथ सरगर,

ऍड. विकास नारनवर व विशाल बनसोडे यांचे वतीने शाळेसाठी ६ सिलिंग फॅन देण्यात आले. यावेळी या सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच सेवानिवृत्तीनिमित्त मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा माया ढोबळे, माजी अध्यक्ष दादा वाघमोडे, जावेद होनवाड,सत्यव्रत गायकवाड, श्रीकांत गुळेग,प्रमोद खरटमल,स्नेहल ताटे, सर्व पालक,ग्रामस्थ व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख प्रकाश कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन भैरवनाथ आदलिंगे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार सुनिल कसबे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments