Advertisement

राखीव वनपरिक्षेत्रात आग लावत असलेल्या इसमास वनपरिक्षेत्र विभागाने रंगेहात पकडले भेंडवळ बीड मधील घटना

 राखीव वनपरिक्षेत्रात आग लावत असलेल्या इसमास वनपरिक्षेत्र विभागाने रंगेहात पकडले भेंडवळ बीड मधील घटना



आज दि. 07/05/2022 रोजी श्री. बी. डी. कटारीया वनपरिक्षेत्र अधिकारी जळगांव (जा) यांना गुप्त माहिती मिळाली कि, भेंडवळ बीट मधील क.नं. 451 मध्ये एका अज्ञात इसमाने अंगार लावली आहे, त्या अनुषंगाने तात्काळ स्टॉफ सोबत घेऊन घटनास्थळावर गेले व आरोपी रामदास देवचंद सैरीशे वय 54 वर्षे रा. पेसोडा ता. संग्रामपुर जि. बुलडाणा यांला रंगेहात पकडले व ताब्यात घेतले आणि वन गुन्हा 00685/11113 दि. 07/05/2022 जारी करण्यात आला सदर कार्यवाही मा. उपवनसंरक्षक श्री. अक्षय गजभिये व सहाय्यक वनसंरक्षक बुलडाणा श्री. आर. आर. गायकवाड ह्यांचे मार्गदर्शनात पुढील तपास सुरु आहे. तरी सर्व नागरीकांना वनपरिक्षेत्र अधिकारी जळगांव जामोद यांचेतर्फे आव्हान करण्यात येते की, राखीव वनात अंगार लावणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे, तरी कोणी ईसम अंगार लावण्याचे कृत्य करतांना आढळुन आले तर वनविभागाला माहिती दयावी. व सहकार्य करावे.


सदर कार्यवाहीत श्री. बी. डी. कटारीया व.प.अ. जळगांव. जा, श्री. जी. जी. दंडे वनपाल खांडवी अति. कार्यभार वरवट बकाल, श्री. संदीप पांडुरंग देवकर वनरक्षक भेंडवळ बीट, श्री. जी. एस. खोलगडे व.र. ईस्लामपुर, कु. आरती पर्वते व कु. निता फलके वनरक्षक, श्री. प्रकाश चितोडे व भगवान जामुनकर वनसेवक श्री. गणेश तराळे चालक यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments