फर्दापूर येथे गुटखा व सुगंधित तंंबाखू वाहतूक करणारा आयशर जप्त
फर्दापूर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी तब्बल ५२,१५,२०० गुटखा केला जप्त
सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण
सोयगाव तालुक्यातील जगप्रसिद्ध फर्दापूर येथे पोलीस स्टेशन हाद्दीत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व संगधित तंबाखू वाहतूक करणारा आयशर व्हॅन असा एकूण 52,15,200/- रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त.दिनांक 06/05/2022 रोजी फर्दापुर पोलीस ठाण्याचे दबंग सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे, यांना त्यांच्या गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पोलीस ठाणे फर्दापुर हद्दीत जळगाव ते औरंगाबाद " हायवे रोड ने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व सुगंधित तंबाखु असे आयशर कंटेनर मध्ये चोरटी विक्री करण्यासाठी अवैध गुटखा, पान मसालाची वाहतुक केली जाणार आहे. अशी खात्रीलायक गोपणीय बातमी मिळाल्याने स.पो.नि. देवीदास वाघमोडे व त्यांचे पोलीस कर्मचारी पथकाने तात्काळ संध्याकाळी सात वाजता वाजेच्या दरम्यान जळगाव ते औरंगाबाद हायवे रोडवर हॉटेल कन्हैया कुंज जवळ पथकांनी सापळा रचला असता
यावेळी मिळालेल्या माहिती प्रमाणे त्यांना समोरून एक आयशर कंटेनर वाहन येतांना कर्मचारी यानां दिसले. सदर वाहनाचे चालकास गाडी थांबवण्याचा इशारा देवुन वाहन थांबविले. चालकास विचारपुस करता वाहनचालक हा सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागल्याने पोलीसांचा संशय बळवला त्यास अधिक विश्वासात घेऊन विचार पुस केली असता त्याने त्याचे नाव हमीद हरुण खॉ वय 35 वर्षे रा. नखरोला जि.पलवल हरियाणा राज्य येथील असून सदर वाहन हे दिल्ली येथुन घेवुन सोलापुर कडे जात असल्याचे सांगितले.
आयशल वाहन क्रमांक एच.आर. 73ए-2236 यांचे सिल पंचासमक्ष तोडुन त्यांची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला 29,95,200/- रुपये किंमतीचा प्रिमियम राज निवास पान मसालाच्या 78 गोण्या व 15 गोण्या प्रिमियम एक्स. एल. सुंगधीत तम्बाच्या 7,20,000/- रुपये कि.अं. गोण्या मिळून आल्याने आयशर गव लाल रंगाचा किंजं. 15,0000/- अस एकूण 52,15,200/- रुपयांचा मुद्देमालहा पंचासमक्ष जप्त करण्यांत आला आहे.
यावरून पोलीस ठाणे फर्दापुर येथे गुरनं. 41/2022 कलम 188,273,328 भादंवी व कलम 59 अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 प्रमाणे दाखल करण्यात आला असुन वाहन चालक हमीद हरुण खॉ वय 35 वर्षे रा. नम्ररोला जि. पलवल हरियाणा राज्य यास अटक करण्यात आली आहे. व पुढील तपास स.पो.नि. देवीदास वाघमोडे व करित आहेत.सदरची कामगिरी मा. मनीष कलवानिया, पोलीस अधिक्षक, मा. डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विजयकुमार मराठे, उपविभागीय पोलीस अधिकारी, सिल्लोडा यांचे मार्गदर्शनाखाली श्री. देविदास वाघमोडे, स.पो.नि. पोलीस अंमलदार सचिन काळे, योगेश कोळी प्रदिप बेदरकर यांनी केली आहे.
0 Comments