जलगांव जा. तालुक्यातील पाटण (वडगांव) येथे स्वातंत्र्यविर गणपतराव इंगळे उद्यानविदया महाविदयालयातील बि.एस.सी ऑनर्स उद्यानविद्या ७ व्या सत्राच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांतर्फे ग्रामीण उद्यानविदया कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत माती परीक्षण प्रात्यक्षिकाचे दि.11/08/23 रोजी आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणासंबंधी जनजागृती व्हावी, यासाठी उपक्रम राबविण्यात आला.
गावाजवळील शेती परिसरात हा कार्यक्रम होण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरपंचपती मा. विठ्ठल घुले (वडगांव पाटण), उपसरपंच मा. सोपान वाघोदे (वडगांव पाटण) व तेजराव घुले पाटील, रामभाऊ शंकर पाटील, साहेबराव सोनोने यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला समस्त शेतकरी बांधव व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी माती परीक्षणातील प्रमुख सूक्ष्म द्रव्य, सेंद्रिय कर्ब, सुक्ष्म जीवाणू याचे महत्त्व शेतक-यांना सांगण्यात आले. तसेच माती परीक्षणाच्या पध्दती आणि या सर्वांचा शाश्वत शेती व खत व्यवस्थापनासाठी होणारा वापर कृषीदूतांनी समजुन सांगितला. प्रात्यक्षिक स्वरुपात शेतकऱ्यांचे मातीचे नमुने घेऊन कृषी विज्ञान केंद्र जलगांव (जा) येथे परीक्षणासाठी देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वैष्णवी पाटील, ऋतुजा माळोदे, साक्षी ठोंबरे, रुपाली सेलोटे, सपना वाघ, सरस्वती सोळंके, श्रुती मालोकार, मोहिनी वाक्कर व प्रियंका पटोकार या विदयार्थीनींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी विदयार्थ्यांना महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. विशाल तायडे उपप्राचार्य प्रा. सतिश धर्माळ, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रितेश वानखडे व विषय विशेषज्ञ प्रा. आकाश सुने यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments