Advertisement

पाचोरा येथील पत्रकारावर हल्ला करून मारहाण करणाऱ्या विरोधात कठोर कारवाईची मागणी...

प्रतिनिधी:-
शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी धमकी दिलेल्या पाचोरा येथील पत्रकाराला पालिकेसमोर बुधवारी सायंकाळी टोळक्याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. संदीप महाजन असे मारहाण झालेल्या पत्रकाराचे नाव असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सात वर्षांच्या मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी जिल्ह्यातील वातावरण तप्त असताना पाचोरा येथील स्थानिक पत्रकार महाजन यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करीत विश्लेषणात्मक बातमी केली होती. यात त्यांनी आक्षेपार्ह बाबींचा उल्लेख केल्याचा आरोप करीत आमदार पाटील यांनी त्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून शिवीगाळ करीत धमकावले होते. यासंदर्भातील ध्वनिफीत समाजमाध्यमातून बाहेर आल्यानंतर आमदार पाटील यांनी शिवीगाळ केल्याचे कबूल केले होते. पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर हल्ला करणारे विरोधात कठोर कारवाई करून आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीसाठी 14 ऑगस्ट रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे उपविभागीय अधिकारा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देताना अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जळगांव जा.तालुका अध्यक्ष दत्तू दांडगे, सचिव संतोष कुलथे, अभिमन्यू भगत, अश्विन राजपूत अमोल भगत, विनोद चिपडे, विनोद वानखडे ,विजय वानखडे, गजानन सोनटक्के, शमीम देशमुख, मंगल काकडे, अमर तायडे, गणेश भड, अनिल भगत यांच्यासह बहुसंख्य पत्रकार यावेळी उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments