मलकापूर 14(8/23 भारत सरकारच्या मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान भीमनगर येथे त्रिरत्न महिला बचत गटाच्या वतीने राबविण्यात आले आहे.
मेरी मिट्टी मेरा देश अभियानाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून अशांत भाई वानखेडे नगरसेवक तथा समतेच निळ वादळ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व दीपक खोडे प्रकल्प अधिकारी नगरपरिषद प्रामुख्याने उपस्थित होते.त्यावेळी मेरी मिट्टी मेरा देश अभियानाला काशाच्या क्लशाचे पूजन अशांतभाई वानखेडे नगरसेवक यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी नगरपरिषद कर्मचारी मीना चोपडे ,संतोष पाटील, अंगणवाडी सेविका राजकन्या वानखेडे नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी त्रिरत्न महिला मंडळाचे अध्यक्ष रेखा सरदार, सचिव कविता अजने, उपाध्यक्ष ज्योती दांडगे, शोभा पानपाटील ,लक्ष्मी सरदार, निर्मला इंगळे, सुनिता शेगोकार आधी महिला मंडळाच्या महिला मोठ्या संख्येत उपस्थित होते.
0 Comments