Advertisement

राजर्षी शाहू बँकेचे वतीने शिवभक्तांना महाप्रसाद चे आयोजन हजारो भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

प्रतिनिधी नागेश भटकर
जळगाव जामोद  इथे चौथ्या श्रावण सोमवार निमित्त वन बुलढाणा मिशन च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण जळगांव जामोद येथे सर्व कावडधारि व तमाम शिव भक्तांसाठी फराळाची व्यवस्था कारण्यात आली होती.या वेळी भगवान शिव यांच्या प्रतिमेला हारार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या वेळी हजारो शिवभक्तांनी फराळाचा आस्वाद घेत कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला.
या वेळी राजर्षी शाहू परिवाराचे सर्वेसर्वा मा. संदीपदादा शेळके, डॉ. सौ.उज्वलाताई पाटील.,डॉ.ज्ञानेश्वर देशमुख,दत्ताभाऊ पाटील,रमेश ताडे, राजर्षी शाहू बँकेचे विभागीय व्यवस्थापक संतोष ऊबरहंडे, चिखली शाखेचे व्यवस्थापक अनिल सुसर, जळगाव जामोद शाखेच्या व्यवस्थापिका नूतन मनोज वाघ,व वन बुलढाणा मिशन चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments