चोहोट्टा बाजार प्रतिनिधी अमोल राणे
जालना येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांतर्फे आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेमुळे मराठा आरक्षणाचा विषय तापला असून राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. या घटनेचा निषेध म्हणून मंगळवारी बारा सप्टेंबरला चोहोट्टा बंदची हाक देण्यात आली होती त्यानुसार दवाखाने वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद होती. चोहोट्टा येथे आंदोलनमध्ये सामाजिक व सर्व राजकीय संघटनेचे आजी, माजी पदाधिकारी, महिलावर्ग, युवा मंडळी मोठ्या संख्येने येथे सहभागी झाले होती. मराठा आरक्षण सामाजिक व समर्थन, लाठीचार्ज निषेधार्थ चोहोट्टा बाजार बंदला सर्वधर्मीय बांधवाचा स्वयंम उत्स्फूर्त सहभाग बंदमध्ये दिसून आला. , दुकाने स्टोअर्स व कडकडीत बंद पाळण्यात आला.सकल मराठा समाजाच्या या सुरू असलेल्या आंदोलनात चोहोट्टा बाजार परीसरातील विविध राजकीय संघटनांनी बंदला पाठिंबा दिला होता त्यामुळे सत्ताधाऱ्यांना आता घाम फुटला खासगी वाहतूकीसह व्यापारी बांधवानी बाजारपेठ कडेकोट बंद ठेवून शांततेत सकल मराठा समाजाचे यशस्वी आंदोलनाला सर्वच स्तरावर व्यापक प्रतिसाद दिला. चोहोट्टा पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. या दरम्यान दहीहंडाचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मोर्चामध्ये सहभागी झालेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम दातकर वंचित बहुजन आघाडीचे मनोहर शेळके राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश मंगळे शिव सेनेचे शरद बुंदे गोपाल म्हैसने वंचित बहुजन आघाडीचे तालुका संघटक सुरेंद्र ओइम्बे विलास पाटील वसु स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर मोडक प्रहारचे उपजिल्हाध्यक्ष जिवन खवले कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बाबुराव इंगळे प्रकाश राणे पंचायत समिती सदस्य मुस्ताक शहा राजू मोडक संदीप वडाळ राहुल लावडे धीरज गावंडे संदीप इंगळे संजू बुध सुयोग आठवले डॉ विजय म्हैसने श्रीकांत साबळे बाळासाहेब इंगळे अमोल म्हैसने पंकज जुबळे विनोद वसु उपस्थित होते
0 Comments