Advertisement

आंदोलनाचा इशारा देताच सुस्थ आरोग्य यंत्रणेला आली जाग

आंदोलनाचा इशारा देताच सुस्थ आरोग्य यंत्रणेला आली जाग
अकोट प्रतिनिधी अमोल राणे 
टाकळी खुर्द येथील नागरिकांनी प्रहार जनशक्ती संपर्क कार्यालयामध्ये टाकळी खु येथून ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटकर यांनी कार्यालयामध्ये फोन लावून सांगितले की टाकळी खुर्द गावात येथे टायफॉइड मलेरियाची साथीची लागण झालेली आहे तरी इतर वैद्यकीय सेवा देण्याकरता कोणी वैद्यकीय अधिकारी ,कर्मचारी येत नाहीत तसेच जीवन खवले प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष यांनी त्वरित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल राठी फोनवरून संपर्क करून साथीची तापाची माहिती दिली डॉक्टर राठी यांच्या मार्गदर्शनाखाली ताबडतोब वैद्यकीय टीम दाखल झाली यामध्ये समुदाय अधिकारी डॉक्टर अमोल सर ए एन एम धनी सिस्टर एन पी डब्ल्यू वासेकर एन पी डब्ल्यू वाडेकर एन पी डब्ल्यू मेटांगे अशा मदतीने सौ मातुरकर सेविकिने सकाळी नऊ वाजता पासून प्रारंभ केला, त्यामध्ये 90 पेशंटची तपासणी करण्यात आली आणि त्यांना औषध गोळ्या देण्यात आल्या प्रहारचे जिवन खवले यांच्या माध्यमातून त्वरित दखल घेतल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष जीवन खवले यांचा ग्रामपंचायत उपसरपंच सौ. मीना चंद्रशेखर गवळी ,सदस्य दिपक पाटकर,अक्षय गवळी ,सुनील दामोदर ,जमिर शहा आणि गावकरी मंडळींनी प्रहार जनशक्ती पक्षाचे शेतकरी संघटना उपजिल्हाप्रमुख जीवन खवले यांचा शाल श्रीफळ देऊन समाधान व्यक्त करत सत्कार केला

Post a Comment

0 Comments