*अकोट नगरपालिका द्वारे करण्यात आलेली मालमत्ता कर वाढ हे सर्व सामान्य जनतेचे लूट आहे*
*मालमत्ता कर वाढीला स्थगिती देण्यात यावी*
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरूजमा यांच्या नेतृत्वामध्ये असंख्य नागरिका सह निवेदन देण्यात आले*
अकोट: अकोट नगर परिषदेने सन २०१२-१३ ते २०१५-१६ या चतुर्थ कर आकारणी मध्ये बदल करून सन २०२३-२४ते२०२६-२७ या आर्थिक वर्षामध्ये प्रस्तावित केलेली कर आकारणी वाढ ही सर्वसामान्य,गोरगरीब, कामगार, व रोजगार करून उदरनिर्वाह करणाऱ्या वर अन्यायकारक व आर्थिक लूट करणारी वाढ आहे.
अकोट नगरपालिकेने केलेली मालमत्ता कर वाढ ही नगरपालिकेद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधा व विकास कामाच्या पेक्षा जास्त आहे मालमत्ता कर वाढ करून ते नागरिकावर लादून त्यांचे आर्थिक शोषण होत आहे अकोट नगरपालिकेद्वारे झालेली किंवा होत असलेले विकास कामे ही ठराविक वस्त्यांमध्ये होत असून या विकास कामापासून मध्यमवस्ती, कनिष्ठ वस्ती, निम्म वस्ती, त्यामधील नागरिक वंचित आहेत त्या सोयी सुविधा पासून कोसो दूर आहेत, या कर वाढीमुळे या नागरिकांना सुद्धा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे त्यामुळे लागू केलेली मालमत्ता कर वाढ मागे घ्यावी यासाठी अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरूजमा त्यांच्या नेतृत्वामध्ये अकोट नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी शहरातील असंख्य मालमत्ताधारक नागरिक नगरपालिके च्या प्रांगणामध्ये उपस्थित होते. निवेदन देता वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष राजेश भाल तिलक, श्री आनंद शेठ अग्रवाल, संध्याताई वाघोडे, डॉ. विशाल इंगोले श्री हरिभाऊ वाघोडे, मंजुषा देशमुख, श्री ज्ञानेश्वर मानकर, मोहम्मद नूर जमा माजी नगरसेवक, मोहम्मद खालिद जमा माजी नगरसेवक, मोहम्मद अरमान, यांच्यासह अकोट नगरपालिकेतील विविध प्रभागातील मालमत्ता धारक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments