Advertisement

पंकज देशमुख आत्महत्या प्रकरणाशी आमच्या पतींचा संबंध नाही ? महिलांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी..

*पंकज देशमुख आत्महत्या प्रकरणाशी आमच्या पतींचा संबंध नाही.. महिलांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी...*
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

पंकज देशमुख आत्महत्या प्रकरणात दोष नसताना आंदोलन कर्ते यांनी आमच्या पतींचे नांव संबंधित तक्रार मध्ये टाकण्याचा केविलवाणी प्रकार घडवून आणत आहेत. पंकज देशमुख आत्महत्या प्रकरणी आमच्या पतींचा कोणताही संबंध नसून स्व.पंकज देशमुख आत्महत्या प्रकरणात आमच्या पतींचा दोष नाही या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सत्य बाहेर आणावे अशा आशयाचे निवेदन दिनांक २५ जुलै रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना देण्यात आले.पंकज देशमुख प्रकरणात ज्यांची नावे तक्रार अर्जात देण्यात आली होती. त्यांच्या कुटुंबीयांनी जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांची भेट घेऊन निवेदन दिले. या प्रकरणी माध्यमांमध्ये आमच्या पतींचे नाव आल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. आम्ही मानसिक तणावात आहोत. आमचे पती निर्दोष असून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न न्यायहक्क जनआंदोलन समितीमार्फत होताना दिसत आहे. त्यात आमचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांचे काही बरे वाईट झाल्यास हेच लोक त्याला जबाबदार असतील, अशा आशयाचे निवेदन गीता गजानन सरोदे, शिल्पा परीक्षित ठाकरे, सुमती नीलेश शर्मा, भावना सचिन देशमुख, नंदा नरेंद्र देशमुख, तिरोत्तमा अंबादास शेळके, नाहिद परवीन अब्दुल जलील, परवीन जहाँ जकीउल्ला खान, पूनम रवींद्र लपटणे, द्वारकाबाई तुकाराम धर्मे आदींनी दिले आहे. निवेदनात नमुद केले आहे की, या प्रकरणाची आमचा काहीही संबंध नाही. आमची समाजात नाहक बदनामी होत आहे. तसेच सदर समिती ही राजकीय हेतूने प्रेरित असून तक्रारदार यांच्या सतत संपर्कात राहून दिशाभूल करीत आहेत, असे कुटुंबीयांचे मत झाले आहे. तसेच आमच्या पतींवर इतर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे आमच्या पतीवर खोटे गुन्हे दाखल करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे या महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments