पूर्णा नदीपात्रातून वाळू माफियांकडून रात्रंदिवस केनी व जेसीबीच्या साह्याने केला जातो हजारो ब्रास रेतीचा उपसा.
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
बुलढाणा = शेगाव तालुक्यातील भास्तन येथील पूर्णा नदी पात्रातून भोटा,कठोरा सगोडा या घाटातून परिसरातील वाळू माफिया हे कुणालाही न भिता दिवस रात्र अवैध रित्या केनी व जेसीबीच्या साह्याने अवैध रित्या हजारो ब्रास रेतीचा साठा उपसत असल्यामुळे महसूल विभागाला कोट्यावधी रुपयाचा चुना लावत असून महसूल बुडवीत आहेत तरी सदर वाळु माफियाविरुद्ध महसूल प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे..
सविस्तर माहिती अशी की शेगाव तालुक्यातील येथून जवळच असलेल्या भास्तन येथील पूर्णा नदी पात्रातून भोटा, कठोरा, सगोडा या शिवारातील घाटातून शासनाच्या वतीने नदीपात्रातील कोणत्याही घाटाचा लिलाव झालेला नसताना सुद्धा महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचून खुल्याआम पने जराही भीती न बाळगता परिसरातील वाळू माफिया हे मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस पूर्णा नदीपात्रातून हजारो ब्रास रेतीचा अवैध रित्या उपसा करीत असल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे..
येथील पूर्णा नदीपात्रातून रात्रंदिवस खुलेआमपणे अवैध रित्या रेतीचे उत्खनन होत असताना सुद्धा परिसरातील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, एचडीओ व महसूल प्रशासन सदर वाळू माफियाविरुद्ध कारवाई करण्यास का मागेपुढे पाहत आहे असा प्रश्नही परिसरातील नागरिकांमध्ये उपस्थित केल्या जात आहे. तरी आता या बाबीकडे जिल्हा अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालण्याची गरज आहे अशी मागणी ही होत आहे.
*तर परिसरातील रेती तस्करांचे रोडवर विशेष पथक तैनात असून रात्रंदिवस पेट्रोलिंग करून रोड क्लियरच्या सूचना देऊन मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीची वाहतूक करून महसूल प्रशासनाची दिशाभूल करतात पन प्रशासन मात्र मुंग गिळून गप्प असल्याची चर्चा आहे.*
पूर्णा नदीपात्रातून सध्या मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात असून यामधून अनेक वाळू माफिया गब्बर झाले असून ते सबकुछ मॅनेज है ची भाषा करीत असल्याचे समजते.तर रेती घाटातून रेतीची अवैध वाहतूक करण्यासाठी रेती माफियांनी वेळेचे सुद्धा भान ठेवले आहे तर यामुळे तालुका प्रशासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडत असून याकडे खनीकर्म विभागाकडून बघ्याची भूमिका घेतल्या जात असल्यामुळे या वाळू माफियांचे आता मुस्क्या कोणावर असा प्रश्नही उपस्थित केल्या जात आहे...
0 Comments