*वरवट बकाल येथे अवैध गुटख्यावर तामगाव पोलिसांचा छापा*
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यात असलेल्या वरवट बकाल येथे साई किराणा दुकानवर मिळालेल्या गोपनीय माहिती वरून दि. 19 जुलै रोजी रात्री 10 वाजे सुमारास तामगाव पोलीस पथकाने छापा टाकला....यावेळी तामगाव पोलीस पथकाने प्रतिबंधीत व अवैधरित्या गुटखा संबंधीत दुकानाची झडती घेतली असता विमल गुटखा ३८ पाकीट , सुगंधीत तंबाखुचे २० पाकीट, केसर युक्त पान मसालाचे २२ पाकीट , व्हि सुगंधीत तंबाखुचे पाऊच असलेले ११० पाकीट , सुगंधीत तंबाखुचे प्रत्येकी २२ पाऊच असलेले ७९ पॅकेट , 1 जर्दाचे ३० पाऊच असलेले १३ पॅकेट , असा सर्व मिळून एकूण २८ ,हजार २३३ रुपयाचा मुद्देमाल प्रतिबंधीत गुटखा मिळून आला.... सदर मुद्देमाल जप्त करुन तामगाव पोस्टेला जमा करण्यात आला अन्न औषध प्रशासन विभागाला लेखी कळविल्या वरून अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांनी दि. 21 जुलै रोजी तामगाव पो. स्टे. मधील मुद्देमालाचा पंचासक्षम पंचनामा केला व तामगाव पोस्टेला दिलेल्या फिर्यार्दी वरून आरोपी विनोद भगवान धर्मे रा वरवट बकाल याच्या विरूध्द विविध कलमानुसार अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे... याबाबत सदर आरोपीस संग्रामपूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला दोन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली असून पुढील तपास तामगाव पोस्टेचे ठाणेदार राजेन्द्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोउपनि विलास बोपटे करित आहे
0 Comments