संग्रामपूर /- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दिव्यांगाच्या प्रश्नावरुन प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.. अशी मागणी करत बच्चू कडूंनी विदर्भात पदयात्राही काढली होती. आता बच्चू कडू यांनी सरकारला घेरण्यासाठी रस्त्यावरील लढाईला सुरुवात केली आहे. आज राज्यभर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून चक्का जाम आंदोलन सुरु आहे. संग्रामपूर तालुका प्रहारचे वतीने आज सकाळी 8 वाजेदरम्यान संग्रामपूर शहरात रास्ता रोको करून चक्का जाम आंदोलन करण्यात आले.जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यन्त आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे इशारा यावेळी देण्यात आले.प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावतीने शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर विविध पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.आज संग्रामपूर तालुका प्रहारच्यावतीने संग्रामपूर- जळगांव जामोद रस्त्यावरील धामगाव रस्ता चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.त्यानंतर तामगाव पोलिसांकडून कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.यावेळी नगरपंचायतचे गटनेते शंकर पुरोहित, प्रहारचे युवा संग्रामपूर तालुकाध्यक्ष सौरव बावस्कर,हरिभाऊ तायडे,संतोष सावतकार,सिद्धार्थ सोनोने,अतुल वानखडे,विजय वानखडे,साबीर भाई यासह प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी तामगाव पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
0 Comments