बुलढाणा जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे लाकूड तस्करी उघड,!
मोताळा तालुक्यातील वाघजाळ फाटा येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे वनसंपत्तीची तस्करी करत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. बिस्मिल्ला सॉमीलचे मालक आणि वनपाल पी. एन. जाधव यांच्यावर संगनमत करून बनावट पासद्वारे निम,आंबा व बेरड्या प्रकारच्या लाकडांची वाहतूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिल क्रमांक 211 आणि ऑनलाईन पास क्र. M.F.D.2024-AM-AMBU T.P.189567 दिनांक 23 एप्रिल 2024 तसेच पास क्र. M.F.D.2024-AMBU T.P.188186 दिनांक 19 एप्रिल 2024 या दोन्ही पासमध्ये जोडण्यात आलेल्या टीपी (ट्रान्सिट पास) मध्ये उल्लेख असलेल्या
लाकडांचा प्रकार फसवणूक करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर कागदपत्रे तपासणी दरम्यान बनावट असल्याचे निदर्शनास आले.
वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, वाहन क्रमांक MH 28 BB 2383 मध्ये मोठ्या प्रमाणावर कट साईज निम,आंबा आणि बेरडा लाकूड बेकायदेशीररीत्या बुलढाण्याकडे नेले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोताळा रेंजमधील कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करत वाघजाळ फाट्यावर सदर वाहन थांबवले. तपासणी दरम्यान, त्या वाहनातील कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर वाहन वनपरिक्षेत्र कार्यालय, समोर आगारात मोताळा येथे लावण्यात आले. दुसऱ्या दिवशी तपासणी दरम्यान संबंधित लाकूड हे नियमबाह्य असल्याचे निष्पन्न झाले. परिणामी, वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या आदेशाने वनरक्षकांना P.O.R. (प्रोटेक्टेड ऑफेन्स रिपोर्ट) जारी करण्यात आला.
या प्रकारामुळे संबंधित जळगाव जा वन परिक्षेत्र चे वनपाल पी. एन. जाधव यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला बिस्मिल्ला सॉमीलचे मालक व वनपल यांनी संगनमत करून भ्रष्टाचार केल्याचा ठपका जनतेकडून लावला जात आहे. यासंदर्भात फौजदारी आणि वन कायदा अंतर्गत कठोर कारवाई करून आरोपींना पोलिस कोठडी मिळावी,अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे सुरू असलेली लाकूड वाहतूक आणि त्यामागील अधिकारी–व्यवसायिकांचे संगनमत हे गंभीर बाब मानली जात आहे.असाही आरोप सामाजिक कार्यकर्ते व जनतेकडून होत आहे,
0 Comments