तात्कालीन "सरकार''हे शेतकऱ्यांचे संकटकालीन परिस्थितीत लक्ष न देता, सरकारमधील मंत्री महोदय हे शेतकऱ्यांना अभद्र बोलणे, झगळे करणे, रमी सारखे जुगार खेळणे, खोटी आश्वासने देणे.अशा परिस्थितीमध्ये व्यस्त आहे. तरी त्यांचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, परिस्थिती निवडण्यासाठी लक्ष वेधणे,हे उद्दिष्ट बाळगून शहरांमध्ये जिल्ह्यामध्ये संपूर्ण ठिकाणी चक्काजाम आंदोलने शांततेमध्ये पार पडले.
आता कोकाटे सारख्या व्यक्तींचे पद काढून त्या ठिकाणी सामंजस्य साधनारा व्यक्ती नेमस्त होईल, असे शेतकऱ्याच्या जनतेच्या मनामध्ये यश आहे.
तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा मध्ये दिल्ली ते गल्ली पर्यंत सरकार असून,आता तरी माननीय मुख्यमंत्री यांनी दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करणे ही काळाची गरज आहे. असे जनतेची आशा दिसत आहे.
या आंदोलनामध्ये प्रहार संघटनेचे अजय भाऊ टप, अजित फुंदे, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ॲड.साहेबराव मोरे साहेब. नगरसेवक ॲड. हरीश रावळ, शहर अध्यक्ष रईस जमादार, शेतकरी संघटनेचे दामोदर शर्मा, निलेश नारखेडे, मनसेचे दीपक राठोड, गणेश ठाकूर, तसेच उबाठाचे गजानन भाऊ ठोसर व कार्यकर्ते. यांच्यासह विविध पक्षातील जनता व शेतकरी वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणात हजर राहिले.
गजानन बी.कवळे.
जिल्हा प्रतिनिधी जळगाव.(खां.)
0 Comments