Advertisement

एक पाऊल प्रगतीच्या दिशेने... " केळी निर्यात"

एक पाऊल प्रगतीच्या दिशेने... 
                      " केळी निर्यात"
     पंचाळा ता.संग्रामपूर येथील प्रगतिशील शेतकरी  ज्ञानेश्वर खानजोड यांच्या शेतातील केळी अखाती देश ईराण येथे निर्यात करण्यात आली. याचा शुभारंभ दि.21 जुलै 2025 रोजी पंचाळा येथील शेतकरी खानजोड यांच्या मळ्यात आयोजित करण्यात आला होता. 
       याप्रसंगी सातपुडा शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष व महासिध्द अर्बन बँकेच्या अध्यक्षा डॉ.सौ.स्वातीताई संदिप वाकेकर,जिल्हा कृषी अधीक्षक मनोजकुमार ढगे, तहसीलदार प्रशांत पाटील साहेब, कृषी उपविभागीय अधिकारी व्यवहारे सर,  संग्रामपूर तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव ,कृषी विज्ञान केंद्र जळगांव जा चे शास्त्रज्ञ शशांक दाते, उद्यान पंडित सचिन कोरडे, संग्रामपूर तालुक्यातील कृषी विभागाचे अधिकारी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
  छोट्याश्या गावा –गावातील शेतकऱ्यांनी मनावर घेतले तर काहीही होऊ शकते, कोणतीही गोष्ट असाध्य नाही. फक्त गरज आहे चिकाटी मेहनत व त्याला जोड हवी विज्ञानाची, नवनवीन तंत्रज्ञाना ची. असे सांगून सर्व परिसरात आदर्श निर्माण करणारे खाणझोड कुटुंब यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 
      इराणला केळी जाणाऱ्या गाडीला आमच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. संग्रामपूर तालुक्यातील फळ बागायतदार शेतकरी यांनी प्रेरणा घ्यावी. असेच निर्यातदार शेतकरी आपल्या भागात होऊन शेतकरी समृद्ध व्हावा .
  सदर कार्यक्रम वेळी केळी उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वरभाऊ खानजोड याचा यावेळी सत्कार करण्यात आला.
  सदर कार्यक्रमाला पंचाळा गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments