Advertisement

रस्त्याचा प्रश्न मार्गी लावुन नाली बांधकाम करा.. जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांची गटविकास अधिकाऱ्यांना मागणी

*रस्त्याचा प्रश्न मार्गी लावुन नाली बांधकाम करा.. जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांची गटविकास अधिकाऱ्यांना मागणी...*

जळगाव जामोद प्रतिनिधी...

जळगाव जामोद शहरातील रशिद सेठ यांचे घरापासून सै.शकिल यांचे घरापर्यंत च्या भर वस्तीतील रस्ता अद्यापही झालेला नाही.येथील रहिवासी राहत असलेली जागा ही धानोरा महासिध्द ग्रामपंचायत हद्दीत येत असुन त्या रस्त्याची अवस्था अत्यंत नादुरुस्त झाली आहे.या भागात मदरसा असुन येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भर पावसाळ्यात चिखल तुडवत जावे लागते.ग्रामपंचायत धानोरा महासिध्द ने अद्यापही येथील नागरिकांना कोणत्याच सुख सुविधा पुरविल्या नाहीत गेल्या कित्येक वर्षांपासून येथे रस्ता नाही व सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाल्यांची व्यवस्था नाही.येथे नाली व रस्त्याचा  प्रश्न तातडीने मार्गी लावावा या मागणीसाठी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांच्या नेतृत्वात येथील नागरिकांनी दिनांक २५ जुलै रोजी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.येथील नागरिकांचा रस्ता व नाली चा प्रश्न १३ आँगष्ट पर्यंत मार्गा लागावा अन्यथा १४ आँगष्ट पासून गटविकास अधिकारी कार्यालया समोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यावेळी समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस, तालुका अध्यक्ष मुस्ताक जमदार, सैय्यद अमन,बाबु खान,शेख रहेमान, शेख कलीम यांचेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments