Advertisement

मलकापूर तालुक्यातील दसरखेड नजीक असलेले टोल नाका येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केले आंदोलन.

मलकापूर तालुक्यातील दसरखेड नजीक असलेले टोल नाका येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केले आंदोलन.
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर:- संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार टोलनाक्यावरील बेसुमार लूट सुरू असून या टोल वसुलीच्या विरोधात मनसेने आंदोलन सुरू केले असून या बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्त वाहिनीमध्ये सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चार चाकी वाहनांना कोणत्याही प्रकारचा टोल आकारल्या जात नाही परंतु बुलढाणा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी टोलवर लहान चार चाकी वाहनांना कडून टोल वसुली होत असल्याचे दिसून येत असल्याने मनसे तालुका अध्यक्ष पंकज पाटील नेतृत्वात दिनांक ११ ऑक्टोबर २०२३ रोजी मलकापूर तालुक्यातील राज्यमहामार्ग क्र.५३ दसरखेड येथील टोल नाक्यावर दुपारी १२:३० वाजता मनसे पदाधिकाऱ्यांनी टोलमुक्ती साठी आंदोलन सुरू केले. यामध्ये मनसे पदाधिकारी टोल नाक्यावर पोहोचताच टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी सर्व चार चाकी वाहनांना मोफत जाऊ दिले. टोलनाक्यावर लहान चार चाकी वाहनांना धारकांनी आंदोलन करर्त्यांचे आभार मानले, यावेळी दसरखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार कोळी साहेब यांनी आंदोलन करर्त्यांना डीटेंट करून सोडून दिले.या वेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष दीपक राठोड,मनसे तालुका अध्यक्ष पंकज पाटील,मनवीसे ता.अध्यक्ष गणेश जैस्वाल,मनवीसे शहर अध्यक्ष निखिल पोंदे, गजराज साळुंके,दुर्गेश ढोलकर,नितीन कदम,वैभव चोपडे,गणेश आकोटकर, विजय तांबे,विठ्ठल चंदनशिव,धीरज भगत,दीपक राऊत,भूषण सुरंगे,तेजस दांडगे यांचे सह मनसेचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments