नांदुरा: तालुक्यातील भोटा येथे दिनांक १० आॅक्टोबर २०२३ रोजी शेगांव ते कठोरा बससेवेचा थांबा हा भोटा पर्यंत वाढविण्यात आला.सदर बसेवेचा थांबा हा अनेक दिवसांपासून कठोरा पर्यंतच होता.त्यामुळे भोटा,रोटी,दादगांव, हिंगणा भोटा, हिंगणा इसापूर, हिंगणा खोंड, माऊली, टाकळी पारस्कर सह पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना तसेच विदर्भातील पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी शेगांवला जाणार्या भक्तगणांना व प्रवाशांना कठोरा पर्यंत जाऊन मग तेथून बसने शेगांव असा प्रवास करावा लागत होता. शिवाय भोटा पर्यंत खामगांव आगाराची बससेवा सुरू असली तरी सदर बसमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने अनेकदा विद्यार्थ्यांना बस मध्ये जीव मुठीत धरून गच्च भरलेल्या बसमधून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने हि बाब हेरून १२ सप्टेंबर २०१९ रोजी एसटीच्या महाव्यवस्थापक यांना निवेदन दिले होते. आणि त्यानंतर एसटीच्या महाव्यवस्थापक यांनी सदर बससेवेचा थांबा भोटा पर्यंत वाढविण्यासाठी तसे निर्देश देखील दिनांक ०२ जानेवारी २०२० च्या पत्रात दिले होते.परंतु कोराना महामारीमुळे पुन्हा सदर बससेवा सुरू होण्यापूर्वीच बंद करण्यात आली होती. परंतु मनसेच्या विद्यार्थी सेनेने ही आपली मागणी ही विद्यार्थ्यांसाठी असून ती ठाम पणे पूर्ण करण्याचा जणू निर्धारच केला. आणि मनसे माथाडी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीकृष्ण सपकाळ व राज्य उपाध्यक्ष श्री विठ्ठल भाऊ लोखंडकार यांच्या मार्गदर्शनाखाली म.न.वि.से उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर व म.न.वि.से जिल्हा सचिव राहुल चोपडे यांनी दिनांक १४ जुलै २०२३ रोजी शेगांव आगारास निवेदन दिले.त्यानंतर दिनांक १८ जुलै रोजी एसटीच्या विभागीय नियंत्रक यांना निवेदन दिले. दोन्ही ही निवेदनाची दखल न घेतल्याने पुन्हा दिनांक १२ सप्टेंबर २०२३ रोजी एसटीच्या विभागीय नियंत्रक बुलडाणा यांना सदर निवेदनाचे स्मरणपत्र दिले.त्यानंतर विभागीय नियंत्रक बुलडाणा यांच्या निर्देशानुसार शेगांव आगार व्यवस्थापक श्री गो.प्रा. जंजाळ साहेब यांनी सदर बससेवेचा थांबा हा १० आॅक्टोबर पासून सकाळी १०:०० वाजता भोटा येथे नियमितपणे पाठणार असल्याचे मनविसे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर पाटील यांना दुरध्वनी द्वारे कळविले होते. सदर बससेवेचा थांबा हा भोटा पर्यंत वाढविल्याने भोटा येथील पंचक्रोशीतील विद्यार्थी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे आभार मानले आहे.
बस गावात येताच वाहक श्री परमेश्वर पितकर, गोपाल गवळी व चालक श्रीकृष्ण बुट्टे यांचा मनविसे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर,भोटा सरपंच, उपसरपंच,व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मनविसे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर, सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं.सदस्य तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments