हिवरखेडवरुन बाळासाहेब नेरकर
अडगांव बु.कायदा, सुव्यवस्था आबादीत राखण्यासाठी सर्व धर्मीयानी पोलीस यंञनेला मदत करा.अन्यथा कायदा मोडणा-यावर लगेच कठोर शासन करावे लागेल.यात कोणाचीही गय केली जाणार नाही.दि.३०/९/२०२३ च्या अडगांव बु.घटनेवर एस.डी.पी.ओ.मॅडम तीव्र नाराज होत्या.पोलीस यंत्रणेनी तूमचावर विश्वास ठेवला पण तूम्हीच पोलीस यंञनेचा विश्वास घात केला.परत एकदा अडगांवला अतिसंवेदनशीलच्या लाईनीत नेउन उभे केले.नवदुर्गा उत्सव मिरवणुकीत दिलेली वेळ, म्युझिक सिस्टिम,अस्लील गाणे, वाजवु नये आपली सस्कृती परंपरा पारंपारिक पध्दतीचेच वाद्य वाजवावी व ४५डिसेबलच्यावर कोणत्याही वाद्याचा आवाज जाणार नाही याची काळजी घ्यावी.अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असे व्यतिपादन एस.डी.पी.ओ.खोकर मॅडम यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले.
शांतता समितीची बैठक ग्रामसचिवालय येथे संपन्न झाली.या वेळेस मंचकावर एस.डी.पी.ओ.रितू खोकर , ठाणेदार पांडव व मनोहरलालजी फाफट उपस्थित होते.दुर्गा उत्सवा बाबत व मंडळातील कार्यकर्ते यांच्या सोबत बैठक पार पडली.ठाणेदार पांडव यांनी दुर्गा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी विषेश सुचना दिल्यात.तर फाफटजी यांनी झालेल्या घटनेवर संताप व्यक्त केला.या वेळेस अडगांव बु,हिवरखेड पोलीस,शांतता समितीचे माननीय सभासद, पञकार,ग्रा.प.सदश्य,दुर्गा उत्सव मंडळांचे कार्यकर्ते, दोन्ही म.गांधी तंटामुक्ती अध्यक्ष व पोलीस पाटील उपस्थित होते.
0 Comments