प्रतिनिधी नागेश सुरंगे
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत येथे दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन च्या वतीने आज दिनांक 13/10/2023 रोजी दिव्यांगाचा 5 % टक्के निधी वाटपाबाबत एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. सदर दिव्यांगाचा 5% निधी राखीव ठेवण्यात येतो परंतु माळेगाव येथील दिव्यांगांना सन 2018 ते 2023 पर्यंतचा 5 % टक्के निधी वाटपच केला नाही. सदर दिव्यांगाचा 5% निधी 15 दिवसाच्या आत वाटप न झाल्यास पंचायत समिती समोर आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे.
त्यामुळे आज दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव ग्रामपंचायत येथे दिव्यांगाचा 5 % टक्के निधी बाबत गावातील दिव्यांग बांधवांनी व बुलढाणा जिल्हा अध्यक्ष नागेश सुरंगे यांनी एका निवेदनाद्वारे मागणी केली त्यामुळे सदर ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक सचिव तथा उपसरपंच यांच्याशी चर्चा करण्यात आली व त्यांनी सांगितले की लवकरच दिव्यांगाचा 5% टक्के निधी आम्ही वाटप करणार आहोत.त्यावेळी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश चोपडे,बुलढाणा जिल्हा अध्यक्ष नागेश सुरंगे,तालुका उपप्रमुख सुरेश कोशे, शाखाप्रमुख संजय तायडे, स्वातीताई पाटील, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments