आकोट शहरातील जवाहर रोडवर असलेल्या गणपती गल्लीच्या भूमी लॉन येथे विदर्भातील सुप्रसिद्ध भजन गायक श्री चंद्रकांतजी तिवारी यांच्या सुमधुर वाणीतून श्री.गणेश,श्री खाटू बाबा भजन संध्या संपन्न झाली. गणपती गल्लीद्वारे आयोजित भजन संधेत विदर्भातील सुप्रसिद्ध भजन गायक चंद्रकांत जी तिवारी त्यांच्या सुमधुर वाणीतून श्री खाटू श्याम भजनाने मंत्रमुग्ध होऊन आपण राजस्थान येथील खाटू नगरीत पोहोचल्याचे भक्तगणांना वाटत होते. सदरहू भजन संधेत चंद्रकांत तिवारी व त्यांची टीम अमोल टावरी,धीरज अढाऊ,भूमीत गुप्ता,पाठक, सात्विक,मधुर टावरी यांच्या सोबत स्वरचित भजनांवर भक्तगणांनी थिरकण्याचा आनंद लुटला. शेकडों भक्तगणांच्या उपस्थितीत आकोट नगरीत भजन संध्या संपन्न झाल्याचे चित्र निदर्शनास आले.भजन संध्या चा समारोप आरतीने करण्यात आला. तदनंतर उपस्थित सर्व भक्त गणांनी प्रसादाचा आस्वाद घेतला.भजन संध्या यशस्वी करण्याकरिता सत्यनारायण टावरी,जुगल झुणझुणवाला,सुरेश टावरी,हितेश सेदाणी,यश्विन सेजपाल,संतोष टावरी,हेमंत सेदानी,रितेश सेदानी,किर्तीकुमार पितांबरवाले,अमोल टावरी, अंकित झुणझुणवाला यांनी प्रयत्न केले.
0 Comments