Advertisement

अकोलाचे पालकत्व सोडले नाही खा धोञे यांचे सकल्पींत आरोग्य मेळाव्यासह वीविध कामाचे केले ऊदघाटन*शेवटच्या घटकापर्यंत न्याय मीळेल

अकोलाचे पालकत्व सोडले नाही
 खा धोञे यांचे सकल्पींत आरोग्य मेळाव्यासह वीविध कामाचे केले ऊदघाटन*शेवटच्या घटकापर्यंत न्याय मीळेल
 ऊपमुख्यमंञी ना. देवेद्र फडनविस
हिवरखेड प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर 
 अकोला सर्वोपचार रुग्णालयाच्या इमारतीसाठी १५० कोटी रुपये. अकोल्याचे ग्राम दैवत राजराजेश्वर मंदिराला पर्यटनाचा दर्जा देऊ, अकोल्याचा पालक मंत्री नसलो तरी अकोल्याचे पालकत्व सोडले नाही.अकोला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील रिक्त पदे व सर्व सुविधी उपलब्ध करून देण्याचे अभिवचन व अकोला शहराच्या पाणी समस्यासाठी २५ वर्षाची दूर दृष्टी ठेऊन पाणी उपलब्ध करून देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी करून खासदार संजयभाऊ धोत्रे यांच्या संकल्पित आरोग्य मेळाव्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळेल असा विश्वास व्यक्त केला. 
 स्थानिक मेन हॉस्पिटल येथे मोफत महा आरोग्य शिविराचे उद्घाटन व अकोला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे उद्घाटन, शिवापूर येथे अकोला जिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटांच्या इमारीतीचे भूमिपूजन, बोरगाव मंजु येथील ग्रामीण रुग्णालय, जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून पोलीस विभागाला १५ गाड्या तसेच १९५२ ते २०२३ पर्यंत प्राणाची आहुती देणारे, विरगती प्राप्त झालेले हुतात्मा यांच्या स्मारकाचे उदघाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जिल्ह्याचे पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील हे होते. तर मंचावर आ. रणधीर सावरकर, आ.प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, आ. वसंत खंडेलवाल, आ. अमोल मिटकरी,आ. राजेंद्र पाटणी, आ. लखन मलिक, किशोर मांगटे पाटील, जयंत मसने, अनुप धोत्रे, अनुप शर्मा, जि.प.अध्यक्षा सगीताताई अढाऊ आरोग्य उप संचालक श्रीमती डॉ वारे, डॉ. मीनाक्षी गजभिये, डॉ. गाढवे, अमरावती महसूल आयुक्त श्रीमती निधी पांडे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. श्रीमती वैष्णवी, माजी आमदार बळीराम शिरसकार, डॉ.रणजीत पाटील,सागर शेगोकार, देवाशिष काकड आदी मंचावर उपस्थित होते. 
 राज राजेश्वर परिसराचा विकास करण्यासाठी पर्यटनाचा दर्जा देऊन निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा प्रास्तावीकातुन भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर यांनी करताच तत्काळ मंजुरात देऊन निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा ना. देवेंद्र फडणवीस यांनी केली
 अकोला जिल्ह्याचे आपण पालक मंत्री नसलो तरी अकोला जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांचे माध्यमातून विकास निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपले पालकत्व असल्याचे त्यांनी सांगितले या आरोग्य सुविधा ३० हजार पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करून त्यांचे उपचारासाठी निधी कमी पडणार नाही. त्यांना मुंबई – नागपूर गरज असेल तेथील रुग्ण सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. नांदेड येथील घटना दुखदायी असून रुग्णालयात औषधे उपलब्ध करून देण्यसाठी जिल्हा नियोजन समिती च्या माध्यमातून १०% निधी राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच विरोधकांनी आरोग्य सेवेला व सेवा देणाऱ्यांनी बदनाम करून त्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये असे आवाहन केले. देशातील पहिले हुतात्मा स्मारक अकोल्यात होत असल्याचा गौरवद्गार ना फडणवीस यांनी काढून आ सावरकर व शिबीर संयोजक अनुप धोत्रे यांचे कौतुक केले.
 श्रीमती डॉ वारे, व वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. गजभिये यांनी विविध समस्या व प्रास्ताविकातुन केल्या. जिल्हा अभ्यागत समितीचे अध्यक्ष आ रणधीर सावरकर यांनी आपले अभ्यास पूर्ण भाषणाच्या माध्यमातून शेर शायरी ने ना फडणवीस व जिल्ह्याचे नेतृत्व खा. संजय धोत्रे, आ गोवर्धन शर्मा यांची आठवण काढून त्यांना अभिप्रेत कार्य होत असल्याचे सांगितले

Post a Comment

0 Comments