हिवरखेड प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असलेल्या बुलढाणा अर्बन शाखा तेल्हाराने बुलढाणा अर्बन चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री राधेश्यामजी चांडक उर्फ भाईजी व पालक संचालक डॉ. किशोरजी केला सर यांच्या संकल्पनेतून व चिफ मॅनेजिंग डायरेक्टर मा. डॉ श्री सुकेशजी झंवर यांचे मार्गदर्शनात अकोला विभागाचे विभागीय व्यवस्थापक विठ्ठल दळवी, उमाकांत राखोडे यांच्या सूचनेनुसार हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम चितलवाडी फाटा येथे अज्ञात बेवारस इसमाचा मृत्यू झाला असता सदर मृतदेहाचा अंत्यविधी करण्यास कुणी पुढे सरसावत नव्हते. परंतु नेहमी सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असलेल्या बुलढाणा अर्बन परिवाराने हिवरखेड पोलीस स्टेशनच्या विनंतीवरून सदर इसमाच्या अंत्यविधी ची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून तेल्हारा येथील स्मशानभूमीत अंत्यविधी पार पाडला. अंत्यविधीला पोलीस हिवरखेड चे योगेश इंगळे, श्रीकृष्ण सोळंके व नगर परिषद कर्मचारी गणेश बबन कोळी शंकर तसेच बुलढाणा अर्बन शाखा तेल्हाराचे शाखा व्यवस्थापक रामदास भालेराव कर्मचारी रमेश भटकर,पवन बासू, संतोष वाने, अरुण सेंगर, मंगेश मानकर , रमेश कराळे आधी उपस्थित होते .
0 Comments