जळगांव (जामोद), दि. १२ ऑक्टोबर २०२३
सातपुडा शिक्षण संस्था संचालित स्वातंत्र्यविर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय जळगांव (जामोद) येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन खो-खो क्रिडा स्पर्धेचे आयोजन दि. १० ते १२ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत करण्यात आले होते . या आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धेचे समारोप दि. १२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वा. मा.आ.श्री.कृष्णरावजी इंगळे (अध्यक्ष, सातपुडा शिक्षण संस्था, जळगांव जामोद) व मा. श्री. हरिभाऊजी इंगळे (उपाध्यक्ष, सातपुडा शिक्षण संस्था) यांचे हस्ते करण्यात आले तसेच प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय शितल सोलट (तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी, जळगांव जामोद), डॉ.स्वातीताई वाकेकर (कोषाध्यक्षा, सातपुडा शिक्षण संस्था), श्री.रामदासजी वाकेकर (संचालक, सातपुडा शिक्षण संस्था) श्री नितीनजी सातव (मुख्य कार्यकारी अधिकारी सातपुडा शिक्षण संस्था) आणि श्री. संदीपजी वाकेकर, डॉ. मंजुषा देशमुख, डॉ. अक्षय इंगोले व इतर मान्यवर यांची उपस्थिती लाभली. यावेळी सर्व खेळाडू, संघ व्यवस्थापक तथा प्रशिक्षक यांना मा. आ. श्री. कृष्णरावजी इंगळे (अध्यक्ष, सातपुडा शिक्षण संस्था) यांनी खो-खो खेळाबद्दल, सातपुडा संस्थेतील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल व कृषी क्षेत्रातील शैक्षणिक बाबींवर मार्गदर्शन केले तसेच सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या समारोप समारंभाप्रसंगी डॉ. विशाल तायडे (प्राचार्य, उद्यानविद्या महाविद्यालय), प्रा.योगेश गवई (प्राचार्य, कृषि महाविद्यालय, जळगांव जामोद), प्रा.राहुल तायडे (कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, जळगाव जामोद), डॉ.विरेंद्र डेरे (अध्यक्ष, निवड समिती, डॉ.पं.दे.कृ.वि., अकोला) तसेच आयोजन समितीचे सदस्य, प्रा. धर्माळ, प्रा.सुने, प्रा.भोपळे, प्रा.डव्हळे, प्रा.उमाळे, प्रा.चोपडे, प्रा. हागे, प्रा. आटोळे, डॉ. नीलिमा सदांशीव व इतर तिन्ही महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापिका व कर्मचारी उपस्थित होते. सदर स्पर्धेकरिता पंच म्हणून बुलढाणा जिल्हा खो-खो असोशिएशन च्या पंचांचा चमू उपस्थित होता.
या स्पर्धेमध्ये एकूण मुलांचे २२ संघ व मुलींचे १९ संघ सहभागी झाले आहेत, त्यापैकी अंतिम सामना मुलांमधून स्वा.वीर ग.इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय, जळगाव जामोद व कृषी महाविद्यालय, उमरखेड आणि मुलींमधून स्वा.वीर ग.इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय, जळगाव जामोद व कृषी महाविद्यालय, दारव्हा या संघांमध्ये झाला. यामध्ये मुलांमधून कृषी महाविद्यालय, उमरखेड व मुलींमधून कृषि. महाविद्यालय, दारव्हा विजयी झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जीवेश साळी तसेच आभार प्रदर्शन प्राचार्य उद्यानविद्या महाविद्यालय डॉ .विशाल तायडे यांनी केले.
0 Comments