आज रिल स्टार प्रा.डॉ.प्रशांत महाराज ठाकरे ह्यांचे देवर्डा येथे जाहिर किर्तन
दि.१५ ऑक्टोंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात नवरात्री उत्सवाची जोरदार सुरवात झाली आहे.दरम्यान अकोट तालुक्यातील देवर्डा येथील सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळाने व ग्रामस्थ युवकांनी युवाकिर्तनकार प्रा.डॉ.प्रशांत महाराज ठाकरे यांच्या भव्य जाहीर कीर्तनाचे आयोजन आज दि.१६ऑक्टोबर रात्री ८ वाजता केले आहे.प्रशांत ठाकरे महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रात युवा प्रबोधनकार म्हणून प्रसीद्ध आहेत तसेच सोशल मीडियावर त्यांचे लाखो लोक फॉलवर्स आहेत अशा प्रसीद्ध कीर्तनकाराच्या कीर्तनाचा लाभ परिसरातील सर्व युवक-युवती आणि भाविकांनी घ्यावा असे आवाहन नवदुर्गा उत्सव मंडळ ,देवर्डा यांनी केले आहे.*
0 Comments