संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाअध्यक्ष दत्तू पाटील गावंडे यांच्या मार्गदर्शनात मासिक सभा संपन्न
अकोट तहसील येथे दिनांक 12 10 2023 रोजी संपन्न झालेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या मासिक सभेमध्ये संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, परितक्ता, दिव्यांग, अपंग दीर्घ आजार, अशा प्रकारच्या योजनेचे एकूण 310 अर्ज प्राप्त झाले होते, त्या अर्जांना सभेमध्ये प्राधान्य देत संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाअध्यक्ष दत्तू पाटील गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभेत एकूण 210 अर्जांना मंजूर देण्यात आली , 97 अर्ज त्रुटीमध्ये आढळले व तीन अर्ज नामंजूर करण्यात आले, यावेळी तहसीलदार श्री सुनील चव्हाण अप्पर तहसीलदार श्री सवळे साहेब,नायब तहसीलदार श्रीराव साहेब, व सर्व समिती सदस्य राजू भाऊ माहुलकर, विलास भाऊ बोडखे चेतन डोईफोडे,सुरेश जायले, मुकुंद आप्पा तेल्हारकर , गोपाल रावणकर , सौ विद्या सुनील बदरके, जानराव बेलसरे, यावेळी मासिक सभेला उपस्थित होते
0 Comments