अकोट प्रतिनिधी अमोल राणे
दिनांक 13ऑक्टो. 2023 शुक्रवार ला शासकीय योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड गणवेशाचे तसेच बूट व सॉक्सचे वाटप शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश पेटे , शिक्षणतज्ञ अमोल राणे , समितीतील सदस्य, सदस्या सुनीताताई किरडे , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ काशिगया इंगळे व सहाय्यक शिक्षिका सौ. स्वेता टिकार,यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
कुठला सण असो अथवा नसो तसाही आजचा शुक्रवारचा दिवस मुलांना बाजाराचा दिवस आणि त्यातही आज मिळालेले नवे गणवेश यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधाण आले होते.
आजच्या ह्या गणवेश वाटप कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश दादा पेटे, शिक्षण तज्ञ अमोल राणे तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्या,सुनीताताई किरडे, माजी सरपंच सुदर्शन किरडे, शाळेच्या मुख्याध्यापिका काशीगया इंगळे मॅडम, सहाय्यक शिक्षिका श्वेता टिकार मॅडम, गजू किरडे, गावची आशासेविका वर्षा सनगाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
0 Comments