बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी...
दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सर्वत्र महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली त्यामध्ये जळगाव जामोद शहरात मधील ग्रामीण रुग्णालया मधील डॉक्टरांना देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचा विसर पडला. ग्रामीण रुग्णालयामध्ये दिनांक 2 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरापर्यंत महात्मा गांधी जयंती साजरी केली नव्हती. नंतर शहरातील पत्रकारांनी ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन वैद्यकीय अधिकारी सोनल झंवर यांना विचारणा केली असता आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती रक्तदान कॅम्प व आमच्या ऑफिसमध्ये साजरी केल्याचे सांगितले परंतु काही पत्रकारांनी ग्रामीण रुग्णालय येथे झालेल्या रक्तदान कॅम्प मध्ये सुद्धा महात्मा गांधी जयंती साजरी झाल्याचे चित्रण उपलब्ध नाही. यावेळी पत्रकारांनी डॉक्टर यांच्यावर यांना आपण महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली आहे तर त्याचे फोटो उपलब्ध करून द्या त्यावर वैद्यकीय अधिकारी सोनल झंवर यांनी उडवा उडवी ची उत्तरे देत मला जे काही महात्मा गांधी जयंती साजरी करण्याचे प्रूफ द्यायचे असतील ते मी माझ्या वरिष्ठांना देईल असे म्हणून फोन कट केला व परत पुन्हा फोन घेतला नाही. तर ग्रामीण रुग्णालयामध्ये रात्री बारानंतर एका खोलीमध्ये महात्मा गांधीजींचा फोटो ठेवून त्यावर हार घालून जयंती साजरी केल्याचा बनाव केला. याची चर्चा ग्रामीण रुग्णालयातील रात्री असणाऱ्या रुग्णांमध्ये होत आहे. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीचा विसर कसा काय पडू शकतो याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहेत. तर काही नागरिकांच्या मते अशा डॉक्टरांवर वरिष्ठांनी कठोर कारवाई करावी असे मत मांडले आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर सोनल झंवर यांच्यावर काय कारवाई करतात ते पाहण्याचे अवचित्याचे ठरेल...
0 Comments