Advertisement

भोटा ते कालवड ०३ किमी रस्ता डांबरीकरण करण्यात यावा पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मनविसे ची मागणीनांदुरा प्रतिनिधी राजेश काळे

नांदुरा प्रतिनिधी राजेश काळे
नांदुरा:तालुक्यातील भोटा पासुन कालवड ता.शेगांव पर्यंतचा इजिमा ५४ सुमारे ०३ किलोमीटरचा रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने वेळोवेळी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला जात आहे. याआधी ही मनविसेने भोटा ते कालवड या रस्त्याच्या मागणीसाठी वेळोवेळी निवेदने दिली होती. उपोषण देखील केलं होतं. येथील पंचक्रोशीतील भोटा, हिंगणा भोटा, कालवड, येथील नागरिकांना या रस्त्याने प्रवास करणे फार जिकीरीचे झाले आहे. रस्त्याअभावी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून मनविसे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर यांनी नवनियुक्त बुलडाणा जिल्हाचे पालकमंत्री मा.ना.श्री दिलीप वळसे पाटील यांच्या बुलडाणा जिल्हा दौऱ्यावेळी त्यांनी भेट घेत भोटा ते कालवड सुमारे ०३ किलोमीटर रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी बुलडाणा येथे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मनविसे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पाटील यांनी मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments