मलकापूर : व्हॉइस ऑफ
मीडियाच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी मलकापूरचे मनोज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती व्हाईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे यांनी केली आहे.
देशातील सर्व पत्रकारांची क्रमांक १ पत्रकार संघटना असलेल्या 'व्हॉईस ऑफ मीडिया' या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने 'व्हॉईस ऑफ मीडिया' या राष्ट्रीय संघटनेचे महाराष्ट्र राज्य शिखर पत्रकार अधिवेशन १८ व १९ नोव्हेंबर रोजी गदिमा सभागृह, बारामती, जि. पुणे (महाराष्ट्र) येथे आयोजित करण्यात आले होते. दरम्यान आज १९ नोव्हेंबर रोजी व्हाईस ऑफ मिडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांचे आदेशान्वये जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे यांनी मनोज पाटील यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली आहे व्हॉइस ऑफ मिडिया मलकापूर च्या माध्यमातून नार्याध्यक्षपदावर राहून विविध उपक्रमांमध्ये त्यांच्या सक्रियपणे सहभाग राहिला आहे. त्या धर्तीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी बारामती येथे उपस्थित असलेले विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष विरसिंह दादा राजपूत, ज्येष्ठ पत्रकार रमेश उमाळकर सह मलकापूर तालुकाध्यक्ष धिरज वैष्णव, राजेश इंगळे, प्रविण राजपूत, अशोक रवणकार, कैलास काळे, जमिलभाई, नारायण पानसरे, गौरव खरे, समाधान सुरवाडे, नितीन भुजबळ सर आदी पत्रकार बांधवांनी मनोज पाटील यांच्या नियुक्ती बदल आनंद व्यक्त केला आहे.
0 Comments