Advertisement

दस्तुर रतनजी ग्रंथालय येथे डाॅ पंजाबराव देशमुख यांची 125 वी जयंती साजरी

दस्तुर रतनजी ग्रंथालय येथे डाॅ पंजाबराव देशमुख यांची 125 वी जयंती साजरी
प्रतिनिधी खामगाव 
खामगाव शहराचे भूषण असलेले दस्तुर रतनजी ग्रंथालय येथे दिनांक- २७/१२/२०२३ रोजी भारताचे माजी कृषी व शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे सुरुवातीला सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष  विठ्ठलराव लोखंडकार यांनी पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली आणि पंजाबराव देशमुख यांच्या जीवन आणि कार्याबद्दल माहिती दिली तसेच संस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत भारंबे यांनी पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच  चंदन कौशल्ये यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले यावेळी संस्थेचे सचिव  अनंत वनारे, सहसचिव . गजानन आखरे आणि संचालक  राजेंद्र वानखेडे,  सचिन तांबट,  श्रीकांत वैद्य,  वसंतराव बेलोकार हे सर्वजण उपस्थित होते,तसेच कार्यक्रमाच्या वेळी प्रा. अनिलजी अंमलकार आणी तोंडे गुरूजी यांची उपस्थिती लाभली आणि कार्यक्रमाला ग्रंथालयाचे कर्मचारी ग्रंथपाल राधिका ढोरे, सहग्रंथपाल मंगेश बदरखे, लताबाई विंचू, रवींद्र खराते सर्व वाचक आणि सभासद याप्रसंगी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments