बाळासाहेब नेरकर कडुन
हिवरखेड :- हिवरखेड नगर परिषदेचे जनक विकास महर्षी आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या हस्ते आज दिनांक 10 डिसेंबर रोजी हिवरखेड शहरात ठीक ठिकाणी 85 लक्ष रुपयाच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले.
सदर भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी येथील जिल्हा परिषद सदस्य सुलभा दुतोंडे ह्या होत्या तर प्रमुख उपस्थितीत गावच्या सरपंच वैशाली वानखडे, पंचायत समिती सदस्य गोकुळा महेद्र भोपळे ,उपसरपंच रमेश दुतोंडे, नंदुभाऊ तिडके,अनिल कराळे, भाजपा शहराध्यक्ष प्रवीण येऊल , डॉ.रामदादा तिडके, किरण सेदाणी, गजानन बंड, माजी सरपंच शिल्पाताउ मींलीद भोपळे सह गावकरी या प्रसंगी हजर होते अश्या एकूण 85 लक्ष रुपयाच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. तर विकास कामांच्या भूमिपूजन दरम्यान आमदार भारसाकळे यांनी हिवरखेड नगरपरिषदे बाबत उर्वरित प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून हिवरखेड नगरपरिषद क्षेत्राचा टी.पी.आर तयार करून हिवरखेड साठी कोट्यावधी रुपयाचा निधी खेचून आणण्याचे आश्वासन सूद्दा उपस्थितांना दिले.
0 Comments