Advertisement

सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड येथे महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड येथे महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली
बाळासाहेब नेरकर ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेड येथील स्थानिक सेंट पॉल अकॅडमी, हिवरखेड तर्फे दरवर्षी 6 डिसेंबर रोजी देशाचे संविधान निर्माते, बहुजन जननायक, राष्ट्रनिर्माणाचे अग्रगण्य धुरी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाबद्दल आदर निर्माण व्हावा व राष्ट्र त्या संविधानानुसार चालते ही भावना लोकांच्या मनात दृढ व्हावी यासाठी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केल्या गेली. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार व प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष, शाळेचे उपप्राचार्य सौ. निमिता गांधी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले सर्व प्रथम विद्यार्थ्यांनी संविधानाबद्दल आपले विचार व्यक्त केले त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आपले विचार व्यक्त केले. व सर्वात शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य सौ. निमिता गांधी मॅडम यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा राष्ट्र निर्माणlचेच काम करावे असे आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटीया, उपाध्यक्ष लूणकरंनजी डागा, सचिव प्रमोद चांडक यांनी सदिच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments