जळगाव जामोद बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी पुरवठा विभाग अंतर्गत जिल्ह्यातील सर्व रेशन दुकाने यांना संदर्भीय प्रशासन परिपत्रकान्वये अन्नसुरक्षा व मानदे कायदा 2006 कलम 31 अंतर्गत परवाना नोंदणी घेणे बंधनकारक आहे व त्याबाबत जिल्हास्तरीय ॲडव्हायझरी कमिटी फॉर सेफ फूड हेल्दी डाइट दिनांक 28/7/2023 च्या बैठकीमध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी तालुका निहाय आढावा घेतला असून अध्यापर्यंत कोणत्याच तालुक्यांच्या रास्त भाव दुकानांनी संपूर्ण नोंदणी न झाल्याने माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी रेशन दुकानाचा परवाना अन्नसुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत परवाना हा पुढील पंधरा दिवसांमध्ये नोंदणी करून घेणेबाबत व त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणेबाबत कडवला होता त्याच अनुषंगाने काल दिनांक 13 डिसेंबर रोजी अन्न व औषध प्रशासन मार्फत आढावा बैठक घेऊन जळगाव तालुक्यातील रेशन दुकानदारांना परवाने नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आणि काही लोकांचे परवाने ऑनलाइन करून तहसीलदार शितल सोलाट व औषधोप प्रशासन विभागाचे असिस्टंट कमिशनर सचिन केदारे व पुरवठा निरीक्षक भरत किती यांच्या हस्ते वाटप करण्यात आले ह्यावेळेस पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक पी व्ही आठवले अव्वल कारकून एन वाय शेगोकार व कार्ड लिपिक बी बी बग्गन तसेच तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते
0 Comments