Advertisement

डॉक्टर विना वर्ष भरापासून पिंपळगांव काळे पशु वैदकीय दवाखाना सुरू.

डॉक्टर विना वर्ष भरापासून पिंपळगांव काळे पशु वैदकीय दवाखाना सुरू. 
प्रतिनिधी जळगाव जामोद 
पिंपळगाव काळे :- पशूंच्या आरोग्या संबंधी Foot-and-mouth disease (FMD) लस उपलब्ध करण्यासाठी पिंपळगाव काळे ग्रामस्थांच्या वतीने अतिरिक्त चार्ज असलेल्या पशु वैदकीय डॉ यांना निवेदन कित्तेक दिवसांपासून पशु वैदकीय दवाखान्यात पशूंच्या आरोग्यांसंबंधी लसी उपलब्ध नसल्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना अनेक समस्या भेळसावत आहे विशेषतः बेमोसमी पावसामुळे वातावरणात बदल झाल्यामुळे गुराढोरांच्या तोंडाला पायाला फोळे येतात व ताप सुद्धा येत आहे 
या मुळे गुरेढोरे दगावण्याची शक्यता जास्त असते म्हणून या रोगाला रोखण्यासाठी Foot-and-mouth disease (FMD) या लसीचा उपयोग होत असतो परंतु आद्यपही पिंपळगाव काळे पशु वैदकीय दवाखान्यात ही लस उपलब्ध नसल्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 
तरीही तात्काळ आपण FMD लस पशु वैदकीय दवाखाना पिंपळगाव काळे येथे तात्काळ उपलब्ध करून द्यावी. अश्या स्वरूपाची मागणी पिंपळगाव काळे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली परंतु पशु वैदकीय दवाखान्यात मागणीचे निवेदन देण्याकरीता गेले असता असे समजले की गेले वर्ष भरापासून दवाखान्यात डॉक्टरच उपलब्ध नाहीत,
म्हणून सदर निवेदन हे दवाखाण्यातील डॉक्टरांच्या खुर्चीलाच देण्यात आले पिंपळगाव काळे जिल्हा परिषद सर्कलमधील सर्वात मोठा पशु दवाखाना म्हणून ओळख आहे परंतु पंचवीस हजार लोकसंख्येच्या गावामध्ये गेले वर्षभरापासून डॉक्टर उपलब्ध नाहीत ही खूप मोठी शोकांतिका आहे,
अश्या परिस्थिती डॉक्टर व औषधोपचार अभावी अनेक पशु दगावले आहे तर विविध रोगांनअभावी पशु तडफडत आहेत पशुपालकांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे तरीही प्रशासनाने तात्काळ पशु वैदकीय दवाखान्यात डॉक्टर व औषधे उपलब्ध करून देण्यात यावे,
अन्यथा संबंधित विभागाच्या भोंगळ कारभारा विरोधात ग्रामस्थांच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते युवा नेते प्रकाश भिसे यांनी दिला निवेदन देतेवेळी, वासुदेव दादा चोखंडे, शुभम पाटील, महेंद्र तायडे,ज्ञानेश्वर केदार, जगदीश चोखंडे, वैभव रायने, गोपाळ वासनकर, ओम ताठे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments