Advertisement

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची अधिवेशनासंदर्भात आढावा बैठक संपन्न

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची अधिवेशनासंदर्भात आढावा बैठक संपन्न
प्रतिनिधी जळगाव जामोद ४ जानेवारी २०२४ गुरुवार रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीने व जळगाव जामोद पत्रकार संघाच्या सहकार्याने शहरातील देवाशिष लॉन्स येथे पत्रकारांचे खुले अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे या अधिवेशनासंदर्भात पत्रकारांची आढावा बैठक अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली  दत्त दांडगे तालुका अध्यक्ष यांच्या निवासस्थानी आसलगाव येथे पार पडली अधिवेशनासंदर्भात  नियोजन संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संघटक अभिमन्यू भगत ,
जिल्हाध्यक्ष अनुप गवळी, जिल्हाध्यक्ष प्रदीप मोरे, महाराष्ट्र प्रदेश कार्यालय प्रतिनिधी मंगेश राजनकर, देविदास तायडे, राजकुमार भड , गुलाबराव इंगळे, प्रीतम ठाकुर, शमीम देशमुख, संतोष कुलथे,आश्विन राजपूत, गणेश भड ,गजानन सोनटक्के, अमोल भगत, मनीष ताडे, राजीव वाडे, संजय दांडगे , वासुदेव राजनकार, गजानन खिरोळकार, गोपाल अवचार ,श्रीधर आव्हेकर, संतोष मांजरे, अनिल भगत अमर तायडे,  जफर खान,मंगल काकडे, राहुल निर्मळ ,विजय वानखडे, लियाकत खान, शिवदास सोनोने,अमर तायडे, योगेश म्हसाळ इत्यादी पत्रकार यावेळेस उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments