अकोट प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
स्थानिक सोमवार वेस अकोट येथे सम्राट अशोक पंच बौद्ध महामंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करणार आले होते. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्थानिक अकोट येथे सम्राट अशोक नगर, सोमवार वेस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकळे,
अकोट शहर चे ठाणेदार तपन कोल्हे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंदाडे, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य रुग्णसेवा श्रमिक कामगार संघटनेचे प्रवीण भोटकर, प्रदेश उपाध्यक्ष आशिष सावळे, आकोट येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. धर्मपाल सत्यपाल चिंचोळकर, जिल्हाध्यक्ष विजय गावंडे, माजी सरपंच अविनाश गावंडे, पी.एस.आय. राजेश जवरे, गुप्त विभागाचे रंजीत खेळकर, सुभाष तेलगोटे, सदानंद तेलगोटे, कुलदीप वसु, लखन इंगळे, विकी तेलगोटे, गजानन पाटील जायले, नंदकिशोर शेगोकार, अजिंक्य तेलगोटे, राजेश तेलगोटे, अक्षय पाटील जायले, शेखर बेंडवाल, निर्भय बैरीसाल, यांच्या उपस्थितीमध्ये असंख्य अनुयायांनी रक्तदान करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपल्याला संविधान मिळाले. संविधानामुळे खूप मोठी ताकद समाजामध्ये निर्माण झाली. असे प्रतिपादन अकोट-तेल्हारा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी केले. यावेळी साई जीवन ब्लड बैंक अकोला यांच्या टीमने सहभाग नोंदवला असून या कार्यक्रमाला असंख्य अनुयायांनी रक्तदान करून या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रतिमा आणि प्रोटीन पावडर चे डबे भेट देण्यात आले. यावेळी असंख्य नागरिक उपस्थित होते.
0 Comments