स्थानिक महात्मा फुले मार्केट यार्ड येथे युवासेना ची बैठक संपन्न झाली. यामध्ये संघटना वाढीवर भर देण्यात आला व गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक असे ब्रीद वाक्य घेऊन नियुक्त्या करण्यात आल्या यामध्ये,
युवासेनेच्या उपजिल्हा प्रमुख पदी विशाल झाटे पाटील,तालुका संघटक पदी शेरसिग सोळंके,तालुका सचिव पवन अवचार,उप तालुका प्रमुख राजू घुले,विभाग प्रमुख दीपक बघे,आणि पवन झाले यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख शुभम पाटील,जिल्हा समन्वयक ईश्वर वाघ,तालुका प्रमुख विशाल ताकोते,उपतालूका प्रमुख गोपाल ढगे,अजिंक्य घाईट,शहर प्रमुख अनिस शेख,अंकित माने,राम वांडले,अनिकेत मोरखडे,श्रीजीत गतमने,पवन वाघ,सचिन पाटील आणि शिवसैनिक उपस्थित होते.
0 Comments