जळगाव जामोद तालुक्यात हॉटेल व नाष्टा सेंटरवर घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रास वापर,❓
जळगाव जामोद तालुक्यात हॉटेल व नाष्टा सेंटरवर घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रास वापर, तरी प्रशासनाकडून कारवाई का नाही❓
जळगाव जा. प्रतिनिधी :- नागेश भटकर
हॉटेल व्यवसाय करण्यासाठी घरगुती गॅसचा सिलेंडरचा वापर करण्यास बंदी असली तरी सार्वजनिक ठिकाणीच या नियमाचे सर्रास उल्लंघन केले जात आहे.
हॉटेल चालक हे गॅस सिलेंडर रस्त्यावरच ठेवत असले तरी त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का ?
तहसील, शाळा, कॉलेज, बसस्थानक, हॉस्पिटल अशा सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या नाष्टा सेंटरवर घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रास वापर केला जात आहे...खाद्यपदार्थाच्या गाडीखाली पोत्यामध्ये ठेवण्यात आलेले घरगुती गॅसचे सिलेंडर... शाळा, कॉलेज, बसस्थानक, हॉस्पिटल अशा सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या नाष्टा सेंटरवर घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रास वापर केला जात आहे. कोणाचीही भीती न बाळगता रस्त्यावरच घरगुती गॅस सिलेंडर ठेवून विविध व्यवसाय करणारे विक्रेते शहरभर दिसतात. हॉटेल व्यवसाय करण्यासाठी घरगुती गॅसचा सिलेंडरचा वापर करण्यास बंदी असली तरी सार्वजनिक ठिकाणीच या नियमाचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे जळगाव जामोद शहरात पाहणीत समोर आले आहे. आपल्या घरातील गॅस सिलेंडर संपल्यानंतर ग्राहकांना टाकी मिळवण्यासाठी धडपड करावी लागते. अनेकदा तर विविध प्रकारचे नियम दाखवून गॅस एजन्सीधारक ग्राहकांना टाकी देण्यास उशीर करतात. मात्र, एकीकडे पैसे मोजूनदेखील ग्राहकांना वेळेवर गॅस मिळत नसताना दुसरीकडे घरगुती वापरासाठीची गॅस टाकी अगदी सहजपणे हॉटेल व्यावसायिकांना उपलब्ध होत आहे. जळगाव शहरातील तहसील, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, बसस्थानक अशा सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या विविध हॉटेल व खाद्यपदार्थ स्टॉलला भेट दिल्यानंतर घरगुती गॅस सिलेंडरचा नियमबाह्य वापर समोर आला आहे. तहसील, शाळा व कॉलेजच्या प्रवेशद्वारावरच खाद्यपदार्थांच्या गाड्यांचे अतिक्रमण दिसते. या गाड्यांवर कॉलेजचे तसेच शाळेचे विद्यार्थीची नेहमी गर्दी असते. परंतु येथील खाद्यपदार्थांच्या गाडीवर सर्रास घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करण्यात येतो. विशेष म्हणजे येथील हॉटेल चालक हे गॅस सिलेंडर रस्त्यावरच ठेवत असले तरी त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. तहसील, कॉलेज, शाळा व हॉस्पिटल बाहेर असणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाडीवर देखील घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रास वापर करण्यात येतो. याठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांची सतत वर्दळ असते. दुर्लक्षाचा परिणाम हॉटेल चालकांना सहजगत्या घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध होत असल्यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर घेण्यासाठी धावाधाव करावी लागत नाही. मात्र यामुळे गॅस एजन्सीच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर सिलेंडर ठेवून व्यवसाय करण्यात येत असला तरी प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने घरगुती गॅस वापरण्यास हॉटेल चालकांना प्रशासनाने बेकायदा परवानगी दिली आहे काय, असाच प्रश्न निर्माण झाला आहे.
0 Comments