Advertisement

महसूल विभागाच्या आशीर्वादाने अवैध वाळू उपसा जोरात

महसूल विभागाच्या आशीर्वादाने अवैध वाळू उपसा जोरात
 प्रतिनिधी:-
बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद तालुका हा नेहमीच कोणत्या न कोणत्या प्रकरणाने नेहमी चर्चेत असतो सध्या तर जळगांव जामोद तालुक्यांतील अवैद्य रेती वाळू उपसा हा गोळेगाव बुद्रुक गावच्या हद्दीत जोमाने सुरू असुन याकडे तालुका महसूल प्रशासनातील वरीष्ठ अधिकाऱ्यांचे चांगलेच दुर्लक्ष होत असल्यांचे दिसून येत आहे.जळगांव जामोद तहसीलदार शितल सोलाट यांच्या आशिर्वादाने वाळू उपसा खुप मोठ्या प्रमाणात होत आहे. ट्रॅक्टरच्या अवजारांच्या वाहनाने नदीपात्रातील वाळूची पन्नास फूट खोलीवरून करत असल्याने. नदी काठावरील शेतकऱ्यांची शेतजमीन घसरत आहे. शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खराब होत असल्याकारणाने शेतकऱ्यांनी या वाळू माफियांना विनंती केली की तुम्ही आमच्या शेतामधून तुमची वाहने नेऊ नका परंतु हे वाळू माफिये शेतकऱ्यांच सुद्धा ऐकत नाहीत उलट शेती मालकाला धमकी देवुन तुझ्या च्याने जे काय होईल ते करून घे आम्ही तर रेती वाहू ते त्याच्या शेतामध्ये वायर रोप व वामन्या बांधून रात्री च्या वेळी आठ ते दहा ट्रॅक्टर किनी व वामन्या चालू आहेत ज्यामुळे शेतकऱ्याची शेती खसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.नदी पात्रातील वाळु काढत असल्याने पूर्णा नदीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामधून वाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची हानी झाली आहे तसेच झाड पडली आहेत. कित्येक वेळा शेतकऱ्यांनी आपले म्हणणे प्रशासनाना समोर मांडले असता प्रशासनातील अधिकारी दुर्लक्ष करत आहे. तरी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनीच्या नुकसानीबाबत जळगांव जामोद तालुक्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वाळू माफी आण्णा आवर घालणे गरजेचे आहे. अशी मागणी आता स्थानिक शेतकरी वर्गाकडूंन होत आहे.

Post a Comment

0 Comments