Advertisement

जफर खान अमानुल्ला खान, सुधाकर दापकेकर, बालाजी सुवर्णकार यांची राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार साठी निवड

जफर खान अमानुल्ला खान, सुधाकर दापकेकर, बालाजी सुवर्णकार यांची राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार साठी निवड प्रतिनिधी जळगाव जामोद
लोककला सेवा मंडळ (ऑल इंडिया) एनजीओ नागपूर अंतर्गत - लोकसेवा मंडळ ऑल इंडिया च्या सक्रिय कार्यात सहभाग नोंदवून केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल उदगीर येथील बारा बलुतेदार संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष सुधाकर यांच्या सामाजिक कार्याबद्दल, दैनिक प्रति वार्ता चे कार्यकारी संपादक तथा पत्रकार जफर खान अमानुल्लाह खान यांच्या पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याबद्दल,  विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयातील सहशिक्षक, टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याचे (खाजगी विद्यालयाचे) राज्य - कार्याध्यक्ष, मराठवाडा शिक्षक संघ लातूर प्रसिद्धीप्रमुख, महासंघाचे जिल्ह्याचे दैवज्ञ सोनार कार्यकारणी - सदस्य, बालाजी सुवर्णकार गुरुजी - यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय कार्यात  केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल "राष्ट्रीय जीवन गौरव" पुरस्कारासाठी लोक कला सेवा  मंडळ (ऑल इंडिया) एन. जी. ओ. नागपूरचे राष्ट्रीय अध्यक्ष, (थोर - कलावंत) . प्रा. राजकुमार घुले  यांनी निवड केली  असून राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार - वितरण सोहळा मंगळवार दिनांक - 2 जानेवारी 2024 रोजी नागपूर येथे - अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. सुधाकरराव दापकेकर, जफर खान अमानुल्लाह खान, बालाजी सुवर्णकार गुरुजी यांची"राष्ट्रीय जीवन गौरव "पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल लोक कला सेवा मंडळाच्या राष्ट्रीय महासचिव सौ. दर्शना घुले, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सौ. श्वेता रहागंडाले, राष्ट्रीय उपाध्यक्ष मनोहर धनगरे, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बाबाराव दुपारे,राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख सुभाष तगाळे यांनी अभिनंदन केले असून - या सर्वांच्या निवडीबद्दल सर्व - स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे

Post a Comment

0 Comments