डोणगाव , जमील खा अन्वर खा पठाण पत्रकार ,यांनी 22/11/2023/ला उपविभाग अधिकारी कार्यालय मेहकर येथे तक्रार अर्ज दिले होते त्यावर कोणतीही कार्यवाही न दिसल्यास 1 जानेवारी 2024 पासून लोकशाही मार्गाने उपोषणला आज पासून सुरुवात करण्यात आली आहे तर आज उपोषणाचा 3 रा दिवस आहे आज रोजी आशिष भाऊ रहाठे बुलढाणा जिल्हा शिवसेना उपजिल्हा प्रमुख ठाकरे गट, निंबाजी पांडव माजी सभापती, सरपंच रेखाताई पांडव, अशोक वानखडे, सतीश ताजने सर माजी उपसभापती, बशीर शहा, सुरज दिनोरे, मुक्तेश्वर काळदाते , हमीद भाई मुल्लाजी, अब्रार मल्ली, ज्ञानेश्वर बाजट, खुर्शीद मेकॅनिकल, सचिन गाभणे, शेख सोहेल यांनी भेट दिली, व सांगितले की जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत उपोषण जारी ठेवा आम्ही तुमच्या बरोबर आहोत,तरी शासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची हलचल दिसुन आली नाही आणि तालुक्यातील एक ही वरिष्ठ अधिकारी येऊन. आता पर्यंत उपोषण कर्त्यांशी भेट दिली नाही, कारण राष्ट्रीय पेय जल योजने ची सन 2014 पासुन सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी , डोणगाव येथे राष्ट्रीय पेय जल योजना सन 2014 मध्ये सुरु झाली त्यावर 4.5 कोटी रुपये व त्या नंतर वाढीव निधी देऊन पाणी पुरवठा समिती व अधिकाऱ्यांच्या नियंत्रणा मध्ये सदर योजनेचे काम मादणी धरणा वरुन करण्यात आले परंतु प्रत्यक्षात अंदाज. पत्रकारा प्रमाणे धरणात व फिल्टर प्लॅट वर पाहिजे त्या प्रमाणे काम झाले नाही या मध्ये प्रत्यक्षात निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्यामुळे फिल्टर प्लॅट पर्यंत व तेथुन गावापर्यंत पाणी येऊ शकले नाही.तरी शासनाकडुन वाढीव निधी घेऊन हडप करण्यात आल्याचे लक्षात येत आहे. याबाबत अनेक तक्रार कर्त्यांनी तक्रारी केल्या परंतु अधिकारी व तक्रारकर्ते यांचे संगनमता मुळे थातुर मातुर चौकशी होऊन संबंधीत ठेकेदार अधिकारी व तत्कालिन पाणीपुरवठा समिती यांच्यावर अध्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे सदर कामात भष्ट्राचार झाल्याचा दिसत आहे. कारण तत्कालिन पाणीपुरवठा समिती व सचिव सोबतच संबंधीत प्रशासन यांनी सर्व कामे कागदोपत्र केल्याचे व गावात पाणी न येण्या वरुन उघड होते. त्यामुळे सदर राष्ट्रीय पेय जल योजनेची प्रारंभा पासुन चौकशी करुन दोषी वर तात्काळ कार्यवाही करुन गुन्हे नोंदवावे व योजने वर खर्च झालेले पैसे वसुल करण्यात यावे , आज उपोषणाचा 3 रा दिवस आहे ह्या उपोषणाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.याची नोंद घ्यावी
0 Comments