बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
बुलढाणा:- हिंदवी स्वराज्याच्या संकल्पिका राजमाता, राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या जयंती दिनाच्या पूर्व संध्येला आज दि.11 जानेवारी 2024 रोजी बुलढाणा शहर भाजपाच्या वतीने लोकसभा प्रमुख मा.आमदार विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालय शिवालय येथून शहराध्यक्ष श्री अनंता शिंदे यांच्या नेतृत्वात बुलढाणा शहरातून मोटर सायकल रॅली काढून माँ साहेब जिजाऊ याना अभिवादन करण्यात आले.शिवालय येथे माँ साहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे लोकनेते विजयराज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच माजी नगरसेविका सौ वैजंतीताई कस्तुरे, ऍड.किरणताई राठोड, भाजपा महिला जिल्हा सरचिटणीस सौ उषाताई पवार,सौ योगिता बढे, जेष्ठ नेत्या सौ शोभाताई ढवळे,महिला शहराध्यक्ष सौ वर्षाताई पाथरकर,सौ मीना बिलारी,सौ योगिता शिंदे या जिजाऊ लेकींच्या हस्ते पूजन करून अभिवादन करत संपूर्ण बुलढाणा शहरातून मोटर सायकल रॅलीला सुरवात करण्यात आली. शिवालय पासून संगम चौक,जयस्तंभ चौक,मार्केट लाईन,कारंजा चौक,त्रिशन चौक,चिंचौक चौक ते पुढे बस स्टँड व नंतर शिवालय येथे रॅली ची समाप्ती करण्यात आली. रॅली मध्ये जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अश्या अनेक अनेक घोषणांनी शहर परिसर दणाणून गेला होता व भगवामय झाला होता.माँ साहेब जिजाऊ ह्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व ते स्वप्न पूर्ण करण्या साठी शिवरायांना प्रेरणा दिली त्यामुळे शिवराय तयार करायचे असतील तर प्रत्येक घरा घरात आधी जिजाऊ तयार व्हायला हव्यात त्यामुळेच माँ साहेब यांचा जन्मोत्सव हा घरा घरात लोकोत्सव म्हणून साजरा व्हावा अश्या प्रतिक्रिया भाजपचे बुलढाणा शहराध्यक्ष अनंता शिंदे यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या.या मोटरसायकल रॅलीत महिला पदाधिकारी यांच्या सह भाजपचे कामगार मोर्चा प्रदेश सचिव श्री विश्राम पवार, कामगार मोर्चा प्रदेश प्रतिनिधी अण्णासाहेब पवार, कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री दत्ता शिंदे, जिल्हा सचिव श्री अशोक कींहोळकर, मोताळा तालुकाध्यक्ष श्री गजानन घोंगडे, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्री मंदार बाहेकर, तालुका सरचिटणीस श्री अर्जुन दांडगे, तालुका उपाध्यक्ष श्री कुलदीप पवार,तालुका सरचिटणीस श्री सचिन शेळके, तालुका उपाध्यक्ष श्री राजू सुरपाटने, भाजयुमो तालुका सरचिटणीस यश तायडे, श्री पवण बगाडे, श्री संतोष पालकर, बाळू ठाकरे, कामगार मोर्चा तालुकाधक्ष्य श्री राजेंद्र पवार, श्री पप्पू सोनकर, अर्जुन कांबळे, प्रकाश राजगुरे, संदीप वानेरे, सुदर्शन कांबळे, अक्षय राठोड ,अशोक बाहेकर, सतीश देहाडराय , चंद्रकांत पाथरकर यांसह असंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments