Advertisement

श्री अंबिकादेवी विद्यालयात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

श्री अंबिकादेवी विद्यालयात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
 
प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर कडून
सौन्दळा ता तेल्हारा येथील श्री अंबिकादेवी विद्यालय हे शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अग्रेसर आहेच सोबतच या विद्यालयात इतरही अनेक विद्यार्थी हिताचे उपक्रम राबविले जातात. त्या अनुषंगाने विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात जवळपास 200 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. हिवरखेड येथील सुप्रसिद्ध डॉक्टर अभिजित उगले व डॉ.सौ.प्राजक्ता अभिजित उगले यांनी विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. यावेळी डॉक्टर अभिजित उगले व डॉ.सौ.प्राजक्ता उगले यांचा विद्यालयाच्या वतीने प्राचार्य रमेश ठाकरे यांनी शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी विद्यालयाचे शिक्षक प्रदिप खुपसे,विलास घुंगड, राजेश टाले,प्रविण चांदूरकार, शैलेश तराळे,यांच्यासह अनंतराव पुंडकर,ज्ञानेश्वर मेतकर,विकास घोले इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महेंद्र कराळे यांनी केले.

Post a Comment

0 Comments