Advertisement

रायपूर पोलीस स्टेशन हद्दीतील जुगारअड्डे व अवैध धंदे बंद करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रायपूर (सर्कल) ची पोलीस अधिक्षकांकडे मागणी

रायपूर पोलीस स्टेशन हद्दीतील जुगारअड्डे व अवैध धंदे बंद करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रायपूर (सर्कल) ची पोलीस अधिक्षकांकडे मागणी
बुलडाणा - प्रतिनीधी (दि.०४/०१/२०२४) :- सध्या अवैध धंदे व जुगार अड्डयाच्या कारणावरुन चर्चेत
असलेल्या रायपूर पोलीस स्टेशन च्या हद्दीत कायदयाला न जुमानता सर्रास वरली, मटका, तितली पत्ता, ऑनलाईन वरली, टेबल मटका, अवैध दारु, गांजा विक्री जोमात सुरु असून पोलीस प्रशासन मात्र खिशात हात घालण्याचे काम करीत असल्याचा आरोप करुन सदर अवैध धंदे व जुगार अड्डे त्वरीत बंद करण्यात यावेत अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येइल असा ईशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायपूर सर्कल पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.

सविस्तर वृत्त असे की, मनसेच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, रायपूर पोलीस स्टेशन हद्दीत वरली मटका व जुगार अड्डे चालविणारे सर्व गुंडप्रवृत्तीचे असून पोलीस स्टेशन मध्ये मात्र त्यांना मान सन्मान मिळतो. कायदा फक्त गोरगरीबांवर अन्याय करण्यासाठीच आहे का? असा प्रश्न पोलीस स्टेशन मध्ये न्याय मागण्यासाठी जाणाऱ्या प्रत्येक पिडीत व्यक्तीला पडतो. पोलीसांनी कायदयाचे पालन करुन अवैध धंदे व जुगार अड्डे बंद करणे महत्त्वाचे असून जर पोलीस प्रशासनाकडूनच कायदा धाब्यावर बसविण्यात येत असेल तर एक दिवस नागरीक कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. असे झाल्यास राज्यात अराजकता निर्माण होइल. ठाणेदार यांना या अगोदरही अनेक निवेदने देण्यात आलेली आहेत. परंतु 'मीच राजा मीच मंत्री' याप्रमाणे ठाणेदार व पोलीस वागतांना दिसतात. पुढे निवेदनात नमुद केले आहे की, रायपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व अवैध धंदे व जुगार अड्डे त्वरीत बंद करावेत. आणि ठाणेदार यांची बदली करावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायपूर सर्कल प्रमुख अविनाश सुरडकर, शाखा प्रमुख सागर इंगळे, शाखा सचिव दिपक भोसले, विजय राऊत, शुभम जाधव, करण शिरसाट, अमित सातव, अजय सुरडकर, अंकुश बरंडवाल, धिरज सुरडकर, सागर नेवरे, वैभव जाधव इ. पदाधिका-यांच्या स्वाक्षन्या आहेत. सदर निवेदन सचिवालय कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री साहेबांना सुध्दा पाठविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments