हिवरखेड येथील गेल्या ३६ वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक विविध लोकपयोगी उपक्रम राबवून समाजहिताय कार्य करणाऱ्या प्रेस क्लबच्या वतीने मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी. प्रेस क्लबचे संस्थापक श्यामशील भोपळे हे होते. प्रमुख उपस्थितीत प्रेस क्लबचे अध्यक्ष रितेश टिलावत,जितेंद्र लखोटिया, गोवर्धन गावंडे, किरण सेदानी, केशव कोरडे, सुनील बजाज, जमीर शेख, मनीष भुडके, राजेश अस्वार हे होते. यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतात श्यामशील भोपळे यांनी समाजभिमुख पत्रकारिता समाज उन्नतीचे लक्षण असल्याने पत्रकारांनी समाज विकासासाठी पत्रकारिता करावी. पत्रकारिता निपक्षपणे करावी, जेणेकरून पत्रकारावरील नागरिकांचा विश्वास दृढ होऊन त्याचे समाज जीवनात सकारात्मक परिमाण व्हावे व सर्व समाजातील घटकांना न्याय मिळवून देता येईल, असे मत प्रतिपादन केले. याप्रसंगी पत्रकार जितेंद्र लाखोटिया यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करून शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष गणेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात सुदाम राऊत,सतीश इंगळे, शहजाद खान,
बाळासाहेब नेरकर मनोज भगत, फारूक सौदागर, प्रशांत भोपळे, ज्ञानेश्वर गावंडे, प्रदीप पाटील,महेंद्र कराळे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.संतोषकुमार राऊत यांनी केले.
0 Comments