खेर्डा संग्रामपूर रोडवर मोटरसायकल व मालवाहू गाडीचा अपघात.. अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू...
जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या खेर्डा बुद्रुक या गावापासून काही अंतरावर आज सकाळी मालवाहक वाहनाच्या धडकेत संग्रामपूर जळगाव जामोद कडे मोटरसायकलवर जाणाऱ्या दांपत्यास धडक दिली व घटनास्थळावर न थांबता तेथून आरोपी चालकाने पोबारा केला. या अपघातामध्ये पती व पत्नी गंभीर रित्या जखमी झाल्याने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दोघांनाही उपचारासाठी भरती करण्यात आले. या जखमी मधील पतीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सविस्तर असे की मृतक विष्णुपंत किसन तायडे व त्यांची पत्नी शोभाताई विष्णुपंत तायडे हे राहणार बेलखेड तालुका तेल्हारा येथून आसलगाव येथील नातेवाईकाच्या घरी लग्नाला चालले होते. खेर्डा नजिक खेरड्यावरून मालवाहक गाडीने यांच्या एम एच 30 बीपी 5659 बजाज प्लेटिना मोटरसायकल ला समोरून धडक दिल्याने मोटर सायकल समवेत दोघेही पती-पत्नी पडल्याने त्यांना गंभीर मार लागला यामध्ये पती विष्णुपंत तायडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी शोभाताई तायडे यांना पुढील उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. सदर घटनेची तक्रार मृतक विष्णुपंत तायडे यांचा पुतण्या संदीप तायडे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली. सदर फिर्यादीत संदीप तायडे यांनी सांगितले की माझा भाऊ व मी खेर्डा बुद्रुक बस स्थानकावर गेलो असता तेथील उपस्थित नागरिकांनी आम्हाला आरोपी विषयी माहिती दिली. त्यामध्ये अपघातास कारणीभूत आरोपी हा खेरडा बुद्रुक येथील शहादेव महादेव वानखडे याने निष्काळजीपणे वाहन चालवून माझे काका विष्णुपंत तायडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले अश्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी शहादेव वानखडे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 306 (A),279,337,338 भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जळगाव जामोद ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.
0 Comments